आयुर्वेदामुळे आजार मुळापासून बरे होतात  डॉ. धनंजय शिरोळकर यांचे मतः सहकारनगर येथील विश्वानंद केंद्रात श्री धन्वंतरी जयंती सोहळ्यानिमित्त धन्वंतरी यागाचे आयोजन

तारां कित Avatar

 

 

पुणे : आयुर्वेदामध्ये आजार मुळापासून बरे करण्याची क्षमता असून शारीरिक आणि मानसिक बळ वाढवण्याची ताकद आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आयुर्वेद ही संतुलित आरोग्य राखण्याची आणि शरीर-मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्याची प्रभावी पद्धत ठरू शकते, असे मत डॉ. धनंजय शिरोळकर यांनी व्यक्त केले.

 

सहकारनगर येथील विश्वानंद केंद्रात श्री धन्वंतरी जयंती सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सर्वांच्या आरोग्यरक्षणासाठी धन्वंतरी यागाचे आयोजन करण्यात आले होते. सुरेंद्र खबिया, अनिता खाबिया यांच्या हस्ते धन्वंतरी याग संपन्न झाला. या प्रसंगी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना साठे, माजी आमदार मोहन जोशी, तसेच विश्वानंद केंद्राचे संस्थापक विश्वस्त राजकुमार चोरडिया उपस्थित होते.

 

केंद्राचे संस्थापक राजकुमार चोरडिया यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले.यावेळी विश्वानंद केंद्रातील सर्व वैद्य, कर्मचारी तसेच उपचार घेऊन बरे झालेले लाभार्थी आवर्जून उपस्थित होते. मंदार खळदकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली महापूजा आणि भक्तिगीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय संचालक डॉ. अजितकुमार मंडलेचा यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर गौस मुजावर यांनी केले.

Tagged in :

तारां कित Avatar