कमांडर युद्धपट दिवाळी विशेषांकाचे  प्रकाशन पुणे येथे संपन्न* 

तारां कित Avatar

 

*राष्ट्रभक्ती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचा उत्तम प्रयोग*

*-पुणे महानगर आर.एस.एस. संघचालक- रवींद्र वंजारवाडकर*

 

पुणे दि. 18 :-राष्ट्रभक्ती, युद्धपट असा आगळावेगळा विषय घेऊन कमांडर ने आपला 29 वा दिवाळी अंक प्रकाशित केला.चित्रपट हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम असल्याने त्याद्वारे जनसामान्यापर्यंत राष्ट्रभक्ती प्रभावीपणे पोहोचू शकते. म्हणून कमांडर चा हा प्रयोग उल्लेखनीय असा आहे,असे प्रतिपादन , पुणे महानगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मा.रवींद्रजी वंजारवाडकर (मा. रविभाऊ) यांनी काल केले.

कमांडर या दिवाळी अंक युद्धपट तथा देशभक्तीपर चित्रपट विशेषांकाचे पुणे येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते

कमांडर’चा या वर्षीचा २९ वा दिवाळी अंक हा ‘युद्धपट विशेषांक’ (देशभक्तीपर चित्रपट) आहे. वाचकांची आवडी – निवडीची नेमकी नस ओळखून विशिष्ट विषय घेऊन त्यावर अत्यंत वाचनीय आणि संग्राह्य विशेषांक प्रकाशित करण्याचं २८ वर्षांचं वैशिष्ट्य ‘कमांडर’ने यंदाही कायम ठेवलं आहे.

29 वर्षापासून कमांडरने सातत्य ठेवून कमांडर ने विविध विषयावर अंक प्रकाशित केल्याचे ऐकून त्यांनी कौतुक केले. आणि कमांडर ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संपादक डॉ. राजू पाटोदकर यांनी कमांडरच्या आतापर्यंत झालेल्या प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती दिली. तसंच कमांडर दिवाळी अंक राज्यात नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गोवा, बेळगाव, पुणे, मराठवाडा, कोकण, इंदोर, पनवेल, मुंबई, नवी मुंबई भागात लोकप्रिय असल्याची माहिती दिली.

*कमांडर वैशिष्ट्ये*

कमांडर’चा या वर्षीचा २९ वा दिवाळी अंक हा ‘युद्धपट विशेषांक’ (देशभक्तीपर चित्रपट) आहे. वाचकांची आवडी – निवडीची नेमकी नस ओळखून विशिष्ट विषय घेऊन त्यावर अत्यंत वाचनीय आणि संग्राह्य विशेषांक प्रकाशित करण्याचं २८ वर्षांचं वैशिष्ट्य ‘कमांडर’ने यंदाही कायम ठेवलं आहे.

या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी डॉ.सौ. शैला वहिनी वंजारवाडकर, लेखिका सौ. अनुजा देशपांडे, अंकाचे संपादकीय सल्लागार मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.

—-

Tagged in :

तारां कित Avatar