ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातर्फे दीपावली उत्सव रविवारपासून (दि. १९)*  सांगीतिक कार्यक्रम, व्याख्यान अशा कार्यक्रमांचे आयोजन 

तारां कित Avatar

 

 

पुणे : ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या वतीने दिपावलीच्या निमित्ताने दीपावली उत्सवाचे आयोजन दि. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान मंदिरामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये सांगीतिक कार्यक्रम, व्याख्यान असे कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता होणार आहेत, अशी माहिती प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी दिली.

 

रविवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता भक्तिरंग हा भक्तीगीते व अभंगाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गायिका रमा कुलकर्णी या सादरीकरण करणार असून रोहन वनगे, प्रसन्न बाम, अभिजीत जायदे हे वादनाला साथसंगत करणार आहेत. तर, मोहित नामजोशी ध्वनी व्यवस्था करतील.

 

सोमवार, दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आणि पुरातन मंदिरांच्या स्थापत्यशैलीचा इतिहास याविषयावर प्रसिद्ध अभ्यासक व व्याख्याते अमोघ वैद्य यांचे व्याख्यान होणार आहे. यानिमित्ताने कसबा गणपती मंदिराचा इतिहास उपस्थितांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.

 

बुधवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वरसंध्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे. यामध्ये गायिका श्रद्धा गद्रे आणि जान्हवी गद्रे या सादरीकरण करणार असून चेतन ताम्हणकर (तबला), पीयूष कुलकर्णी (संवादिनी) हे साथसंगत करणारा आहेत. कीर्ती कुलकर्णी या निवेदन करणारा आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tagged in :

तारां कित Avatar