दिव्यांच्या झगमगाटात ‘शनिवारवाडा’ साकार; पुणे पुस्तक महोत्सवात ‘दिपोत्सव ते पुस्तकोत्सव’ उपक्रम

तारां कित Avatar

 

 

पुणे : ज्ञान, परंपरा आणि प्रकाशाचा संगम घडवणाऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला यंदा आगळावेगळा सांस्कृतिक प्रारंभ लाभला. फर्ग्युसन महाविद्यालयात शेकडो दिव्यांच्या उजेडात साकारलेली ‘शनिवारवाड्याची प्रतिकृती’ पाहताच उपस्थितांच्या डोळ्यांत पुण्याच्या इतिहासाची झलक तरळली. दिवाळीच्या प्रकाशोत्सवाला ज्ञानाच्या दीपांनी जोडणाऱ्या ‘दिपोत्सव ते पुस्तकोत्सव’ या उपक्रमाने महाविद्यालयात अनोखा माहोल तयार झाला.

 

राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (एनबीटी) वतीने १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत भरविण्यात येणाऱ्या या महोत्सवात देशभरातील लेखक, प्रकाशक, वाचक आणि साहित्यप्रेमी एकत्र येणार आहेत. या अनोख्या उपक्रमात मुख्य संयोजक राजेश पांडे, अभिनेते प्रविण तरडे, प्रा. आनंद काटीकर, प्रा. संजय चाकणे, डॉ. देविदास वायदंडे, बागेश्री मंठाळकर, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. डी. बी. पवार, प्रा. सुधाकर जाधवर आणि राहुल पाखरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीने परिसर उजळून निघाला.साहित्य, संस्कृती आणि परंपरेचा संगम घडवणारा पुणे पुस्तक महोत्सव आता फक्त वाचनाचा नव्हे, तर प्रकाश, संस्कार आणि सृजनशीलतेचा उत्सव ठरणार आहे.

Tagged in :

तारां कित Avatar