पक्का पता’: पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच आवाक्यातील घरे बांधण्याचा आनंद गोदरेज कॅपिटलने साजरा केला

तारां कित Avatar

पुणे, 20th ऑक्टोबर 2025: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने त्यांची उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्सच्या माध्यमातून ‘पक्का पता’ अर्थात मालकीचे घर ही नवीन मोहीम सुरू केली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडसह भारतातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्त उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांचा भावनिक प्रवास ही मोहीम टिपते. तसेच भाड्याच्या जागेतून स्वतःच्या मालकीच्या घरात जाण्यासाठी गोदरेज हाऊसिंग फायनान्सला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून मान्यता देते.

 

या मोहिमेच्या केंद्रस्थानी एक साधा, सोपा पण सखोल दृष्टिकोन आहे: ‘पक्का पता’ म्हणजेच कायमस्वरूपी पत्ता, हे भारतीय कुटुंबांचे सर्वात मोठे स्वप्न असते. हा चित्रपट एका कुटुंबाच्या त्यांच्या नवीन, हक्काच्या घरात जाण्याच्या प्रवासाचे चित्रण करतो. सामानाचे उघडे खोके आणि अर्धवट लावलेल्या खोल्यांमध्येही एक हळवा क्षण समोर येतो. जेव्हा त्या मुलाचे वडील आपल्या मुलाची उंची ताज्या रंगवलेल्या भिंतीवर नोंदवतात – पेन्सिलने नाही तर कायमस्वरूपी मार्करने. आई सुरुवातीला आश्चर्यचकित होते. पण, वडील तिला हळूवारपणे आठवण करून देतात की, “ये हमारा खुद का घर है… इस घर में सिर्फ रहना नहीं है… इस घर में जीना है.” कुटुंबाने त्यांचे हे नवीन घर स्वीकारले आहे, ज्यामध्ये केवळ मालकीची भावनाच नाही तर त्यातून मिळणारी आपलेपणा आणि कायमस्वरूपीपणाची भावना देखील अधोरेखित होते.

 

पारंपरिकपणे घर खरेदीसाठी चांगला मुहूर्त म्हणून दिवाळी आणि धनत्रयोदशीचे महत्त्व लक्षात घेत ही मोहीम धोरणात्मकरित्या आखण्यात आली आहे. परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्तपुरवठ्यासाठी ग्राहक-प्रथम दृष्टिकोन अधोरेखित करून या मानसिकतेचा फायदा करून घेण्याचा कंपनीचा उद्देश आहे, ज्यामुळे टियर-2 शहरांमध्ये घर घेणे अधिक सोपे होईल. कारण तेथील घरे आता परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध आहेत.

मुख्य विपणन अधिकारी नलिन जैन म्हणाले, “घर म्हणजे केवळ आर्थिक टप्पा नाही तर तो एक भावनिक टप्पा आहे. ‘पक्का पता’ हा तो क्षण आहे, जेव्हा स्वप्नाचे सत्यात रूपांतर होते. भाड्याने घेतलेली जागा तुमची स्वतःची बनते आणि अनिश्चितता जाऊन अभिमान आणि स्थैर्याची भावना येते. सोपी कर्ज प्रक्रिया, एकूण घराच्या 90% पर्यंत निधी आणि परतफेडीच्या दीर्घ मुदतीद्वारे आम्ही भारतातील उदयोन्मुख बाजारपेठांमधील कुटुंबांसाठी घरमालकी अधिक सुलभ आणि तणावमुक्त बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.”

 

महाराष्ट्रात पुण्यातील पिंपरी-चिंचवडसह विरार, पनवेल, पुणे, जळगाव, बदलापूर, नागपूर आणि नाशिक यासह टियर-2 बाजारपेठांमध्ये तसेच गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा, राजकोट, वापी, गांधीधाम, हिंमतनगर, सुरेंद्रनगर, अंकलेश्वर आणि इतर अनेक शहरांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोना अंतर्गत मेटा आणि यूट्युबसारख्या प्लॅटफॉर्मवर व्यापक दृश्यमानता सुनिश्चित होईल. प्रादेशिक सहभाग मजबूत करण्यासाठी बाह्य सक्रियता तसेच पूरक वाहन ब्रँडिंग असेल.

‘पक्का पत्ता’च्या माध्यमातून घरमालकीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या आपल्या वचनबद्धतेला कंपनी अधिक मजबूत करते. आणि भारतातील महत्त्वाकांक्षी शहरांमध्ये अधिकाधिक कुटुंबांना कायमस्वरूपी, अर्थपूर्ण स्थान मिळवून देण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाला बळकटी मिळते.

Tagged in :

तारां कित Avatar