पुणे : महाराष्ट्रातील व पुण्यातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बुक लायब्ररी आणि इ लायब्ररी कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल मध्ये तयार करण्यात आली आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स लायब्ररीचे उद्घाटन शाळेतील विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आदर्श मित्र मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंड यांच्या संयुक्त विद्यमाने ही लायब्ररी तयार करण्यात आली आहे.
या लायब्ररीच्या उद्धाटनप्रसंदी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनचे सचिव अजय पाटील, हिरे हायस्कूलचे मुख्यधापक अजित माने, रोटरी क्लब ऑफ वेस्ट एंडच्या सुनिता चांदवणकर,उदय कुलकर्णी, रसिक साहित्यचे शैलेश नांदुरकर, आदर्श मित्र मंडळचे अध्यक्ष उदय जगताप उपस्थित होते.
उदय जगताप म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होत आहे. याची माहिती शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही होणे गरजेचे आहे.जगातील चालू घडामोडी विद्यार्थ्यांना माहीत असायला हव्यात. यासाठी या लायब्ररीची सुरुवात करण्यात आली.
तंत्रज्ञानामुळे अनेक बदल घडत आहेत, अनेक क्षेत्रात त्याचा चांगला प्रभाव देखील पडत आहे. याबद्दल माहिती असणे ही काळाची गरज आहे. या लायब्ररीमध्ये एआय अभ्यासक डॉ. अमेय पांगारकर, एआय तज्ञ डॉ. भूषण केळकर यांचे मार्गदर्शन असणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – उदय जगताप – 98225 99132