आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री २० डिसेंबर २०२३ पासून होणार सुरू

तारां कित Avatar

आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडच्या प्रत्येकी २ रुपये (“इक्विटी शेअर”) दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी ४९९ रुपये ते ५२४ रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.

· प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख मंगळवार १९ डिसेंबर २०२३

· बोली/ऑफर बुधवार २० डिसेंबर २०२३ रोजी खुली होईल आणि शुक्रवार २२ डिसेंबर २०२३ रोजी बंद होईल.

· बोली किमान २८ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २८ इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

मुंबई, १५ डिसेंबर २०२३: आझाद इंजिनिअरिंग लिमिटेड (“कंपनी”)ची प्राथमिक समभाग विक्री बुधवार २० डिसेंबर २०२३ रोजी खुली होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख एक दिवस अगोदर म्हणजे मंगळवार १९ डिसेंबर २०२३ असेल. बोली/ऑफर शुक्रवार २२ डिसेंबर २०२३ रोजी बंद होईल.

प्रति इक्विटी शेअरसाठी ४९९ रुपये ते ५२४ रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान २८ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २८ इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

ऑफर मध्ये २,४००.०० दशलक्ष रु. (फ्रेश इश्यू) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या संख्येपर्यंतचे फ्रेश इश्यू आणि विक्रीच्या ऑफरमध्ये ५,०००.०० दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश असून राकेश चोपदार यांच्या द्वारे २,०४९.६५ दशलक्ष रु. पर्यंत, पिरामल स्ट्रक्चर्ड क्रेडिट ऑपर्चुनिटी फंड यांच्या द्वारे २,६०८.५१ दशलक्ष रु. पर्यंत आणि डीएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (एकत्रितपणे “विक्री समभागधारक”) द्वारे ३४१.८४ दशलक्ष रु. पर्यंत पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफरचा समावेश आहे. (असे विक्री समभागधारकांकडून सादर झालेले इक्विटी शेअर्स, “ऑफर्ड शेअर्स”).

कंपनीने ऑफर मधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा विनियोग कंपनीचे भांडवली खर्च पुरविण्यासाठी, कंपनीने घेतलेल्या कर्जाची संपूर्ण किंवा अंशत: परतफेड/ पूर्वफेड करण्यासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्ट यांच्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम ३१ सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(१) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल.

वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी अ) एक तृतीयांश भाग ०.२० दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त आणि १.०० दशलक्ष रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल

Tagged in :

तारां कित Avatar