पुणे, २३ डिसेंबर 2023
फाउंडेशन फॉर अॅडव्हान्सिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी (फास्ट इंडिया) तर्फे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर), पुणे येथे 20 आणि 21 जानेवारी 2024 दरम्यान इंडिया सायन्स फेस्टिव्हल (आयएसएफ) 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
फास्ट इंडिया ही दि कॉन्व्हर्जन्स फाऊंडेशनचे संस्थापक आशिष धवन आणि ऍस्पायरिंग माइंड्स आणि दि चेंज इंजिनचे संस्थापक वरुण अग्रवाल यांनी एकत्रितपणे स्थापन केलेली ना-नफा तत्त्वावरील संस्था आहे.भारतभर विज्ञान आणि तंत्रज्ञानाला चालना देणे हे या संस्थेचे ध्येय आहे.
आयएसएफ 2024 मध्ये 40 हून अधिक तज्ञ सहभागी होणार असून विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवर परिसंवाद व चर्चासत्रे पार पडणार आहेत.ताकाशी इकेगामी (टोकियो यूनिव्हर्सिटी), समीर मित्रगोत्री (हार्वर्ड यूनिव्हर्सिटी), अॅलन हार्वे (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यूनिव्हर्सिटी), सम्प्रीती भट्टाचार्य (संस्थापक, नेविअर), आणि सुदीप पारिख (मुख्य कार्यकारी अधिकारी,एएएएस) अशा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्ती या फेस्टिवलमध्ये सहभाग घेणार आहेत.विविध विज्ञान-संबंधित प्रदर्शने आणि कार्यशाळा देखील आयोजित केली जाणार आहेत . ड्रोन इंटरसेप्टर्स, ऑटोनॉमस व्हेइकल्स, डीएनए आयसोलेशन, ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस आणि बायोनिक्स यांसारखे प्रदर्शन सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी खुले असणार आहे.