पुणे, दि. २५ डिसेंबर: “ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वी दिवसेंदिवस जळत आहे. यामुळे मानवी जीवन एक दिवस पूर्णपणे नष्ट होईल का, ही चिंता सतावत आहे. मणुष्य जातीला प्रगतीच्या पायर्या चढवणारी वाढती औद्योगिक क्रांती एक दिवस मानव जातीलाच संपविणार की काय ही भिती निर्माण झाली आहे.” असे विचार इंडो जर्मन विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राच्या गव्हर्निंग बोर्ड (आयजीएसटीसी) चे सदस्य डॉ. राजू कदम यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडिज आणि एनर्जी स्वराज फाऊंडेशन व स्विच ऑन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘क्लायमेट क्लॉक असेंब्लि अॅड डिस्प्ले’ या कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी एनर्जी स्वराज फाऊंडेशनचे कार्यक्रम प्रमुख सचिन कुमार हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, स्कूल ऑफ इलेक्ट्रिकलचे विभागप्रमुख डॉ. भरत चौधरी, पीएचडी प्रोग्रामचे संचालक डॉ. कृष्णा वर्हाडे, फिजिक्स विभागाचे प्रमुख डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. चेतन खडसे, प्रा. मनिषा वाणी व विद्यार्थी उपस्थित होते.
आयोजित कार्यशाळेत ३६ शिक्षण संस्थांनी सहभाग घेतला होता. तसेच २५० विद्यार्थ्यानी क्लायमेट क्लॉक च्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला. ही ‘क्लायमेट क्लॉक’ सहभागी शिक्षण संस्थांना मोफत भेट म्हणून देण्यात आले.
डॉ. राजू कदम म्हणाले,”बदलत्या परिस्थितीमुळे जागतिक तापमानाची झळ पृथ्वीला बसून त्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशावेळेसे सर्वांना या बद्दल जागरूक असणे काळाची गरज आहे. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या समस्यांसाठी आपण निसर्गाला दोष देतो. परंतू यातील काही समस्या या मानवनिर्मित असतात याचेच परिणाम निसर्ग काही वर्षांनी आपल्याला भोगायला लावत असतो.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” हवामान बदलांना रोखण्यासाठी व कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्वांना या क्षणा पासून सतर्क होणे गरजेचे आहे. एमआयटी डब्ल्यूपीयूने तयार केलेले ‘क्लायमेट क्लॉक’ अत्यंत महत्त्वाचे आहे. खराब हवामानाच्या १.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्या आधीच उलट मोजणी सूरू करून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. ”
प्रा.डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,” ‘क्लायमेट क्लॉक’ हे खराब हवामानाची अचूक वेळ दर्शविण्याचे महत्त्वाचे काम करते. औद्योगिक उत्सर्जन, कार्बन उत्सर्जन त्याप्रमाणे तापमानवाढ रोखण्यासाठी सर्वांनी सामुहिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
डॉ. भरत चौधरी यांनी ‘क्लायमेट क्लॉक असेंब्लि अॅड डिस्प्ले’ची संकल्पना विषद केली. सूत्रसंचालन डॉ. चेतन खडसे यांनी केले आणि आभार डॉ. मनिषा वाणी यांनी मानले.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वी जळत आहे आयजीएसटीसीचे सदस्य डॉ. राजू कदम यांचे विचारः एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘क्लायमेट क्लॉक असेंब्लि अॅड डिस्प्ले’ कार्यशाळा संपन्न
Share with
Tagged in :