*
पुणे, दि. २७: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील ३४ गावात केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली असून यामध्ये २८ हजार ९२७ नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला.
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार आहे. तालुक्यात यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये ३० हजार १२३ नागरिकांनी सहभाग घेतला आहे. ९ हजार ५७३ महिला, १ हजार ९६५ विद्यार्थी, ६७ खेळाडू आणि ७५ स्थानिक कलाकार कलाकारांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.
तालुक्यात आरोग्य शिबारात २५ हजार ६३६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून क्षयरोगासाठी ९३ आणि सिकलसेल समस्येबाबत ६१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत ५४ आणि प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत ४१ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच ३४ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आयुष्मान योजना कार्ड वितरीत करण्यात आले. यात्रेद्वारे ४७ शेतकऱ्यांशी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधण्यात आला. विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शेतीपीकांवर औषध फवारणीबाबत ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे
तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आकर्षक एलडी चित्ररथाद्वारे प्रसिद्धी करण्यात येत असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, महिला बचत गटाच्या सदस्य आदी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होऊन माहिती घेत आहेत. यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना योजनांची माहिती पुस्तिका, घडीपत्रिकेचे वाटपही करण्यात येत आहे. आपल्या गावाताच योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
तालुक्यात २८ डिसेंबर रोजी सुराळे येथे सकाळी ९ वाजता, तेजूर येथे सायं. ५ वाजता, २९ डिसेंबर रोजी अलदरे येथे सकाळी ९ वाजता, गोळेगाव येथे सायं. ५ वाजता, ३० डिसेंबर रोजी पिंपळगाव येथे सकाळी ९ वाजता, गोद्रे येथे सायं. ५ वाजता, ३१ डिसेंबर रोजी सितेवाडी येथे ९ सकाळी वाजता, पारगाव तर्फे मढ येथे सायं. ५ वाजता यात्रा येणार असून नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी हेमंत गरीमे यांनी केले आहे.