गुरुग्राम, ४ जून २०२४: भारतातील आघाडीची जागतिक विमान कंपनी एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी दिल्ली आणि शिवाजी स्टेडियम या दिल्लीतील दोन मेट्रो स्थानकांवर चेक-इन सेवा उपलब्ध आणि सुलभ करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) आणि दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (DIAL) यांच्या सोबत सहयोग केला आहे. दिल्ली विमानतळ चेक-इन आणि बॅगेज ड्रॉप सुविधा प्रवाशांना मेट्रो स्टेशनवर त्यांचे सामान चेक-इन करण्याची सुविधा उपलब्ध करून देत असल्यामुळे बाहेरगावच्या प्रवाशांना सामानाचे ओझे न बाळगता मोकळेपणाने शहर फिरणे शक्य होते. दरम्यान DMRC आणि DIAL द्वारे तयार केलेल्या प्रगत स्वयंचलित पायाभूत सुविधांद्वारे त्यांचे सामान विमानात सुरक्षितपणे लोड केले जाते.
सध्या देशांतर्गत प्रवासासाठी उपलब्ध असलेली ही सेवा आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विस्तारित केली जाईल आणि दोन मेट्रो स्थानकांवर सकाळी ७ पासून रात्री ९ वाजेपर्यंत कार्यरत राहील. देशांतर्गत प्रवासासाठी विमान उड्डाणाच्या आधी चेक-इन १२ तास ते २ तास आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ४ तास ते २ तास आधी केले जाऊ शकते.
“DMRC आणि DIAL सोबतची आमची भागीदारी प्रवाशांना वर्धित आणि विनाअडथळा प्रवासाचा अनुभव देण्याच्या आमच्या बांधिलकीची पावती आहे. हा उपक्रम केवळ दूरच्या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी एक किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देतो एवढेच नाही तर विमानतळावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासही त्यामुळे मदत होते. यामुळे आमच्या सर्व ग्राहकांना अधिकाधिक चांगला अनुभव मिळत आहे. एअर इंडिया आणि DIAL द्वारे भागीदारी केलेल्या आणि अंमलात आणलेल्या डिजीयात्रा, विमानतळ टर्मिनल्सवर सेल्फ-बॅगेज ड्रॉप मशीन तंत्रज्ञान सुविधा असे उपक्रम आमच्या ग्राहकांसाठीच्या सोयीसुविधा आणि समाधानात लक्षणीय वाढ करेल,” असे एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी राजेश डोग्रा म्हणाले.
दर १० मिनिटांनी मेट्रो आहे आणि दिल्ली विमानतळ टर्मिनल 3 वर डिपार्चर लेव्हलवर पोहोचण्यासाठी १९ मिनिटे लागतात. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाचा प्रवास जलद आणि त्रासमुक्त होतो.