नवी दिल्ली : आपल्या मायक्रोफोन पोर्टफोलिओचा विस्तार करत, सोनी इंडियाने आज ECM-W3 आणि ECM-W3S हे वायरलेस मायक्रोफोन ग्राहकांच्या भेटीला आणले. हे अत्याधुनिक मायक्रोफोन वजनाने हलके आहेत मात्र, काम एकदम उत्तम करतात. कोणताही सूक्ष्म आवाज यात अत्यंत चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड होतो. ECM-W3 आणि ECM-W3S ही सोनीची दोन मॉडेल्स व्हिडिओ करणाऱ्यांना एक अत्यन्त वेगळा आणि चांगला अनुभव देतात. कुठेही व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असताना त्यात चांगला आवाज रेकॉर्ड होईल, याची दक्षता हे मायक्रोफोन्स घेतात. ECM-W3 मध्ये दोन-चॅनेल रिसीव्हर आणि दोन मायक्रोफोन्स तर ECM-W3S मध्ये एक-चॅनेल रिसीव्हर आणि एक मायक्रोफोन आहे.
कोणत्याही रेकॉर्डिंगमध्ये अन्य आवाज कमी रेकॉर्ड होतील याची काळजी घेत हे मायक्रोफोन हवे असलेले सगळे आवाज अगदी करेक्ट रेकॉर्ड करतात. सोनी कॅमेऱ्यांमधील मल्टी-इंटरफेस (MI) शू कम्पॅटिबिलिटी सोबतच USB Type-C® टर्मिनल आणि 3.5mm ऑडिओ आऊटपुटची सुविधा मिळते. यामुळे कॅमेरे, स्मार्टफोन आणि पीसी अशा USB टर्मिनल आणि 3.5mm ऑडिओ इनपुटसह सुसज्ज उपकरणांशी कनेक्शन करणे सोपे होते. या मायक्रोफोन्समध्ये नॉईज-कट फिल्टरची सुविधा देखील आहे. जी डिजिटल सिग्नल देत कर्कश्श आवाज कमी करते आणि लो-कट फिल्टर वारा, एसीचा आवाज किंवा व्हायब्रेशन सारखा कमी-फ्रिक्वेंसी असलेला आवाज कमी करते.
मल्टी-इंटरफेस (MI) शूने सुसज्ज असलेल्या Sony कॅमेऱ्याशी जोडलेले असताना, ECM-W3 आणि ECM-W3S रिसीव्हर डिजिटल ऑडिओ इंटरफेसशी जोडला जातो आणि त्यानंतर कॅमेराच थेट ऑडिओ सिग्नल आऊटपुट रेकॉर्ड करू शकतो. यामुळे इतर आवाजांच्या कमीत कमी हस्तक्षेपासह उत्कृष्ट ध्वनी रेकॉर्डिंग होते. MI shoe ची सुविधा असल्याने बॅटरी-फ्री आणि केबल-फ्री शूटिंग करणे शक्य होते. कॅमेऱ्यावरून थेट रिसीव्हरला पॉवर पुरवली जाते, त्यामुळे बॅटरी संपण्याचं टेन्शन राहत नाही. यात USB Type-C® टर्मिनल देखील आहे, त्यामुळे रिसीव्हरवरून USB-कनेक्ट केलेल्या स्मार्टफोन किंवा PC वर डिजिटल ऑडिओ (48kHz/24bit) आऊटपुट करणे शक्य आहे. याव्यतिरिक्त, हे 3.5 मिमी मिनी जॅक (स्टिरीओ) ऑडिओ आऊटपुट टर्मिनलसह सुसज्ज आहे, जे MI Shoe सुविधा नसलेल्या कॅमेरा, पीसी, आयसी रेकॉर्डर याच्याही सहजपणे जोडले जाऊ शकते. हे कॉम्पॅक्ट आणि लाइटवेट मायक्रोफोन 25.0mm x 52.5mm x 20.5mm (W/H/D) असे आहेत आणि याचे वजन केवळ 17g आहे. तर रिसीव्हर 32.0mm x 29.0mm x 50.0mm (W/H/D) या मापात आहे आणि त्याचे वजन 25g आहे. मायक्रोफोन आणि रिसीव्हर दोन्ही कुठेही, केव्हाही सहज वापरता येतात. हे मायक्रोफोन अधिक टिकावेत यासाठी, ECM-W3 आणि ECM-W3S ते धूळरोधक आणि आर्द्रतारोधक असेच डिझाइन केले आहेत. त्यामुळे मोकळ्या जागेवर देखील हे वापरल्याने काही अडचण होणार नाही. याव्यतिरिक्त, वजनाला हलके आणि पोर्टेबल चार्जिंग केस असल्याने प्रवासात असताना देशील ते चार्ज करणे शक्य होते.
ECM-W3 आणि ECM-W3S हे मायक्रोफोन्स 30 मे 2024 पासून संपूर्ण भारतातील सर्व सोनी केंद्रे, अल्फा फ्लॅगशिप स्टोअर्स, Sony चे अधिकृत डीलर्स, ई कॉमर्स वेबसाइट्स (Amazon आणि Flipkart) आणि प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्सवर उपलब्ध असतील.
मॉडेल
MRP (INR मध्ये)
कधीपासून मिळणार
ECM-W3
39,990/-
30 मे 2024 पासून
ECM-W3S
32,990/-
30 मे 2024 पासून