सिंबायोसिस स्किल्स अ‍ॅन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची इंडिया स्किल्स कॉम्पिटिशनमध्ये यशस्वी कामगिरी

तारां कित Avatar

लॉजिस्टिक्स अँड फ्रेट फॉरवर्डिंग श्रेणी मध्ये बीबीएच्या विद्यार्थ्याने पटकावले सुवर्णपदक, वर्ल्ड स्किल्स स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
* ब्युटी अँड वेलनेसच्या विद्यार्थिनीने स्किन/मेकअपमधील स्किल-बेस्ड हँड्स-ऑन चॅलेंजमध्ये पटकावले कांस्यपदक

पुणे,५ जून २०२४ : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे नुकतेच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप आणि प्रोत्साहन म्हणून किवळे कॅम्पस येथे प्राध्यापक आणि पालकांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

स्कूल ऑफ पोर्ट्स, टर्मिनल मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक्स मधील बीबीए लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटची चौथ्या सेमिस्टरची विद्यार्थिनी सिमोन ग्रोव्हर हिने लॉजिस्टिक्स अँड फ्रेट फॉरवर्डिंग प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. सप्टेंबर २०२४ मध्ये लिओन फ्रान्स येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ब्युटी अँड वेलनेस स्कूलच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी, तहसीन सुतारने राष्ट्रीय फेरीत स्किल-बेस्ड हँड्स-ऑन चॅलेंज स्किन/मेकअपमध्ये कांस्यपदक मिळवले.

बीबीए,लॉजिटिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटचा चौथ्या सेमिस्टरचा विद्यार्थी क्रिश हिंगोराणी याची देखील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली होती.
तारिशी बैस या बीबीए पोर्ट्स अँड टर्मिनल मॅनेजमेंटच्या सहाव्या सेमिस्टरच्या विद्यार्थिनीने राज्य स्तरावर दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

एसएसपीयु मधील एकूण 23 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. 10 विद्यार्थ्यांची राज्य स्तरासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी 3 विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी झाले होते.

इंडिया स्किल्स स्पर्धा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) तर्फे आयोजित केली जाणारी देशातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा आहे. उच्च दर्जाचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी या स्पर्धेची रचना करण्यात आली असून तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते.प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजित या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी प्राथमिक तसेच जिल्हा आणि राज्य स्तरावरील फेरीत यश मिळवणे गरजेचे असते.

विद्यार्थ्यांच्या सहभाग आणि कामगिरीबद्दल अभिनंदन करताना सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की, अशा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी व प्राध्यापकांसाठी प्रोत्साहन देणाऱ्या असतात.एखाद्या व्यक्तीची चिकाटी आणि कठोर परिश्रमामुळे सहयोगात्मक वातावरण निर्माण होते आणि त्या व्यक्तीला आणखी चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित करते.एसएसपीयूसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

त्या पुढे म्हणाल्या की,कौशल्य ही कार्यक्षमता आणि प्राविण्याची बाब आहे आणि त्यासाठी भरपूर नियोजन आणि सराव आवश्यक असतो.अधिकाधिक विद्यार्थी भारत आणि कौशल्य स्पर्धेत सहभागी व्हावेत आणि स्पर्धात्मक कौशल्यांमध्ये आघाडीवर व्हावेत हा आमचा उद्देश आहे.

सिमोन ग्रोव्हर आणि तहसीन सुतार या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाच्या पद्धतींचे कौतुक केले ज्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत प्रवेश करण्यास आणि हे प्रतिष्ठित पुरस्कार मिळवण्यात मदत झाली.

Tagged in :

तारां कित Avatar