पुणे,28 डिसेंबर 2023 : श्रवणविषयक आव्हाने असलेल्या लहान मुलांनी जिद्दी आणि चिकाटीने सर्व अडचणींवर मात केली आहे.या लहान मुलांचा प्रेरणादायी प्रवास कौतुकास्पद आहे,असे मत कल्याणी टेक्नो फोर्ज लि.च्या अध्यक्ष सुनिता कल्याणी यांनी व्यक्त केले.केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे आयोजित केलेल्या बिग इअर्स ग्रॅज्युएशन सेरेमनी या वार्षिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या आणि पुर्नवसन कार्यक्रम पूर्ण केलेल्या व आता डॉक्टरांच्या सतत मदतीची आवश्यकता नसलेल्या मुलांचे यश साजरे करण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
याप्रसंगी केईएम हॉस्पिटल पुणे च्या प्रशासक शिरीन वाडिया,वरिष्ठ उप वैद्यकीय प्रशासक डॉ.मधुर राव,बिग इअर्स क्लिनिकच्या प्रमुख डॉ.नीलम वेद याचबरोबर बिग इअर्सची टीम,लहान मुले आणि त्यांचे पालक उपस्थित होेते.
सुनिता कल्याणी म्हणाल्या,जीवनाच्या नव्या टप्प्यात पाऊल ठेवत असताना या मुलांच्या प्रवासाचा एक भाग होण्याचा मला विशेष आनंद वाटतो.या सर्व मुलांचे व त्यांना पाठबळ देणार्या त्यांचे सर्व पालक व बिग इअर्सच्या टीमचे मी अभिनंदन करते.
डॉ.नीलम वेद म्हणाल्या की,श्रवणविषयक समस्या असलेल्या मुलांपर्यंत लवकर पोहचणे,लवकर निदान करणे व उपचार सुरू करणे आणि इतरांप्रमाणेच समाजाच्या मुख्य प्रवाहाचा भाग बनण्यास मदत करणे हे बिग इअर्सचे उद्दिष्ट आहे. मुलांच्या व पालकांच्या चेहर्यावर हास्य फुलणे हे संपूर्ण बिग इअर्स टीमचे कठोर परिश्रम आणि वचनबध्दता प्रवर्तित करते.
सुनिता कल्याणी, शिरीन वाडिया,डॉ.मधुर राव व डॉ.नीलम वेद यांच्या हस्ते पुनवर्सन कार्यक्रम पूर्ण केलेल्या मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.बिग इअर्स टीमबद्दल कृतज्ञता म्हणून मुलांना नृत्य,गायन,वादन यांसह विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले.यातील काही मुलांनी आपले अनुभव सांगितले.
आशिष दुबे यांनी आपल्या आभार प्रदर्शन केले.कॉक्लिअर इम्प्लांट कार्यक्रमाला सातत्याने दिलेल्या साहाय्याबद्दल कॉक्लिअर इम्प्लां