भक्कम आर्थिक भविष्यासाठी आरोग्याकडे लक्ष द्या – असित रथ

तारां कित Avatar

पुणे,28 डिसेंबर 2023 : आरोग्याकडे खर्च म्हणून न पाहता भविष्यातील धोरणात्मक गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. निरोगी आणि तंदुरूस्त शरीरासाठी गुंतवणूक करणे हे भक्कम आर्थिक भविष्य सुनिश्‍चित करणे आहे,असे प्रतिपादन अविवा इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक असित रथ यांनी केले. नवीन वर्ष सुरू होत असताना जगभरातील लोकं आरोग्याबाबत संकल्प करतात. या पार्श्‍वभूमीवर आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि आर्थिक कल्याण यांंच्या संबंधावर भर त्यांनी दिला.

ते म्हणाले की, निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास आपण आरोग्यसेवेवर होणारा खर्च कमी करू शकतो,तसेच विम्याचा हफ्ता यामुळे कमी होण्याची शक्यता निर्माण होते. तंदुरूस्त शरीरामुळे आपली उत्पादकता वाढते आणि त्यामुळे आपण जास्त कमाई करू शकतो आणि त्याचबरोबर आपल्या कामकाजाचा किंवा करिअरचा कालावधी देखील वाढू शकतो. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासाठी मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे,यावर त्यांनी भर दिला.

या सर्व गोष्टींबरोबर आर्थिक साक्षरता देखील महत्त्वाची आहे.अर्थसंकल्प,बचत आणि गुंतवणूकीबद्दल माहिती करून घेणे आणि त्या आधारावर माहितीपूर्ण निर्णय घेणे हे आर्थिक अडचणी टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे.

Tagged in :

तारां कित Avatar