तळेगावच्या ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये केमोथेरेपी वॉर्ड सुरु डॉ. सुरेश अडवाणी करणार कर्करुग्णांवर उपचार तळेगावमध्ये स्वतंत्र ओपीडी पुणे – भारतामध्ये दिवसेंदिवस कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरद्वारे तळेगाव येथे कॅन्सरसाठी एक विशेष ओपीडी आणि केमोथेरेपी वॉर्ड सुरू करण्यात आले आहे. सुप्रसिध्द वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुरेश आडवाणी यांच्या मार्फत रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. डॉ. सुरेश आडवाणी यांच्या हस्ते नुकतेच केमोथेरेपी वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख यांची विशेष उपस्थिती होती तर, डॉ प्रताप राजेमहाडिक, गणेश खांडगे, सुधीन आपटे, शैलेश शहा आदी मान्यवरांनी देखील याठिकणी हजेरी लावली.अनुभवी वैद्यकीय ऑन्कोलॉजीस्ट आणि हेमेटोलॉजी तज्ज्ञ डॉ. सुरेश अडवाणी यांनी ल्युकेमिया आणि टार्गेटेड थेरपीत बोनमॅरो ट्रान्सप्लांटची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जगभरातील प्रमुख ऑन्कोलॉजिस्टपैकी एक म्हणून डॉ. सुरेश अडवाणी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी विविध प्रकारचे कर्करोग जसे की, स्तन कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा, डोकं आणि मान, लहान मुलांमधील कर्करोग, रक्ताचा कर्करोग, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि मौखिक कर्करुग्णांवर यशस्वी उपचार करत त्यांना नवे आयुष्य मिळवून दिले आहे. नव्याने सुरु झालेल्या केमोथेरपी वॉर्डच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ सुरेश अडवाणी सांगतात की, पूर्वीपासूनच तळेगाव शहराशी माझे घट्ट नाते आहे त्यामागचे कारण म्हणजे १९८२ साली मी पहिले यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले ज्यामध्ये रुग्ण तळेगावचा रहिवासी होता. आज टिजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरमच्या माध्यमातून तळेगाव तसेच आसपासच्या परिसरातील रुग्णांना सेवा पुरविताना मला अतिशय आनंद होत आहे. याठिकाणी प्रगत तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.पूर्वी 90% रुग्णांमध्ये शेवटच्या टप्प्यात ब्रेस्ट कॅन्सरचे निदान व्हायचै. मात्र वाढती जनजागृती आणि वेळोवेळी तपासणीमुळे हे प्रमाण 10% पर्यंत खाली पोहोचले आहे. वेळीच निदान झाल्याने लवकर उपचार करणे शक्य होते त्यामुळे आज स्तनाचा कर्करोग हा बरा होणारा आजार झाला आहे असे डॉ.अडवाणी यांनी स्पष्ट केले. २०१२ साली डॉ. सुरेश आडवाणी यांना भारत सरकारकडून भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले तर, २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना २००२ मध्ये धनवंतरी पुरस्कार, २००५ मध्ये वैद्यकीय काऊंसिल ऑफ इंडियाचा डॉ. बी.सी.रॉय यांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, २०१४ मध्ये उज्जैन राष्ट्रीय क्रांतिवीर पुरस्कार आणि २००५ मध्ये ऑन्कोलॉजीमध्ये हार्वर्ड मेडिकल इंटरनेशनलचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात स्टेम सेल प्रत्यारोपण सुरू करण्याचे श्रेय डॉ. अडवाणी यांना जाते. टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख सांगतात की, या क्लिनिकचे अनावरण करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. एखाद्याचा अमुल्य जीव वाचवण्याच्या संधी या क्लिनिकची माध्यमातूम मिळाली आहे. रुग्ण सेवा तसेच सुरक्षा, कुशल डॅाक्टरांची टिम आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून ऑन्को लाईफ सेंटरमध्ये नवीन ओपीडी आणि केमोथेरपी वॉर्ड सुरु करत कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ऑन्कोलॉजी मधील सुप्रसिध्द डॉ. सुरेश अडवाणी यांच्या या नव्या उपक्रमाचा मुंबई बरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना नक्कीच फायदा होईल. आपण एकत्र येऊन कर्करोगाविरुध्द लढा देऊया आणि आपले अमुल्य जीव वाचवू.

तारां कित Avatar

Tagged in :

तारां कित Avatar