पिंपरी -चिंचवड महापालिकेत माहे डिसेंबर 2023 अखेर 21 अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त…

तारां कित Avatar

पिंपरी, दि. २९ डिसेंबर २०२३ :- सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांनी यापुढील आयुष्य आपले आरोग्य सांभाळून तसेच नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ व्यतीत करुन आनंदाने जगावे असे मत कामगार कल्याण विभागाचे उप आयुक्त संदीप खोत यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे डिसेंबर २०२३ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या २० आणि स्वेच्छानिवृत्त १ अशा २१ कर्मचा-यांचा सत्कार उप आयुक्त खोत यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या चारुशीला जोशी, विजया कांबळे, उमेश बांदल, बालाजी अय्यंगार, पत्रकार अश्विनी सांबरेकर तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे डिसेंबर २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये कार्यकारी अभियंता शशिकांत मोरे, उपअभियंता लक्ष्मण जाधव, मुख्याध्यापिका सुरेखा उबाळे, दर्शना रोकडे, अलका डुंबरे, मुख्याध्यापक जयंत माळवदे, लेखापाल राजेंद्र बागल, मुख्य लिपिक राजू कोपरे, स्टाफनर्स वंदना गुरव, उपशिक्षक अनघा कुलकर्णी, आरोग्य निरिक्षक राजकुमार वाघमारे, राकेश सौदाई, अग्निशामक विमोचक फायरमन शिवलाल झनकर, रखवालदार दयानंद लोट, मुकादम दिपक चव्हाण, पेंटर आनंदराव आंद्रे, मजूर सुभाष जगताप, सफाई कामगार शशिकला मोरे, अरुण थोरात, सफाई सेवक जोगराज घलोत यांचा समावेश आहे तर उद्यान सहाय्यक अविनाश बालवडकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Tagged in :

तारां कित Avatar