Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्षर योग केंद्राने केले पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्षर योग केंद्राने केले पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

 

पुणे, २५ जून २०२४ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्षर योग केंद्राने,आपले संस्थापक आणि हिमालय सिद्ध योगी अक्षर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाअंतर्गत पाच नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार करून इतिहास रचला आहे. बेंगळुरू येथील अक्षर योग केंद्रात आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात जागतिक विक्रम रचण्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील हजारो योग अभ्यासक आणि उत्साही सहभागी झाले होते. याप्रसंगी नौकासन,कौंडिन्यआसन,चक्रासन,नटराजासन आणि सूर्यनमस्कार अशा एकूण सात योगासनांमध्ये भाग घेतला.नौकासन, कौंडिन्यआसन,चक्रासन,नटराजसन आणि सूर्यनमस्कार या पाच आसनांमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवले गेले. उर्वरित दोन आसनांमध्ये सकारात्मक प्रतिसाद असून निकालाची प्रतीक्षा आहे. या कार्यक्रमाला भारतीय लष्कर,एनसीसी, हवाई दल, कर्नाटक राज्य पोलिसांचे सदस्य तसेच दिव्यांग व्यक्ती, अनाथाश्रमातील मुले, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट समुदायातील सदस्यांसह 3000 हून अधिक लोक उपस्थित होते.उल्लेखनीय बाब म्हणजे अक्षर योग केंद्राने गेल्या वर्षी वशिष्ठासन, उस्त्रासन आणि हलासन ही तीन वेगवेगळी योगासने अनुक्रमे ४५ सेकंद, ६० सेकंद आणि ९० सेकंदांसाठी करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments