Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedएक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा सोमवारी (दि.१) तब्बल १ हजाराहून...

एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा सोमवारी (दि.१) तब्बल १ हजाराहून अधिक भक्तांचा सहभाग ; महाराष्ट्रातील पहिला सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा

पुणे : श्री स्वामी भक्त मठाधिपती दादा ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सद्गुरू शंकर बाबांच्या एक दिवसीय सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी आपटे रस्त्यावरील सेंट्रल पार्क हॉटेल येथे सकाळी १० पासून हा पारायण सोहळा होणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिला सहस्त्र शंकरगीता पारायण सोहळा आहे.

एक दिवसीय शंकरगीता पारायण समिती, श्री स्वामी समर्थ भक्त परिवार पुणे शहर, श्री शंकर महाराज भक्त परिवार पुणे शहर, श्री सद्गुरु चिले महाराज भक्त परिवार पुणे शहर यांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी १० वाजता इष्टदैवत पीठ पूजन होऊन दुपारी ३ वाजता शंकर गीता पारायणाला सुरुवात होणार आहे. पारायणास बसणा-या भक्तांनी श्री शंकरगीता पोथी, बसण्याचे आसन, पोथीसाठी स्टॅन्ड किंवा पाट, १ नारळ असे साहित्य घेऊन यायचे आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरती होऊन रात्री ८ वाजता भजन सेवेला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments