Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedएसबीआय जनरल इन्शुरन्सतर्फे नवीन चंद्र झा यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक व मुख्य...

एसबीआय जनरल इन्शुरन्सतर्फे नवीन चंद्र झा यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून घोषणा

मुंबई, २६ जून २०२४: एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आपले नवीन व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून श्री. नवीन चंद्र झा यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. पालक कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाने या हुद्दयासाठी त्यांना नामांकित केले होते. त्यांनी श्री. किशोर कुमार पोलुदासु यांची जागा घेतली.

 

श्री. नवीनचंद्र झा १९९४ सालापासून स्टेट बँक ऑफ इंडियाशी जोडलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या हुद्दयांवर काम केले आहे. एसबीआय जनरल इन्शुरन्समध्ये सध्याच्या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. नवीनचंद्र झा आंध्रप्रदेशातील अमरावती परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून काम करत होते.

 

श्री. नवीनचंद्र झा यांच्याकडे बँकिंग उद्योगातील तीन दशकांहून अधिक विस्तृत अनुभव आहे. आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कार्यात्मक व कार्यपालनविषयक भूमिका निभावल्या आहेत. यात शाखा व्यवस्थापन, एसएमई कर्जपुरवठ्यावर भर देत कर्जपुरवठा व जोखीम व्यवस्थापन, एचआर व प्रशासन आणि रिटेल बँकिंग आदी क्षेत्रांतील भूमिकांचा समावेश होतो. प्रादेशिक व्यवस्थापक, उपव्यवस्थापकीय संचालक (सीडीएस), उपव्यवस्थापकीय संचालक (केडर व्यवस्थापन), नेटवर्कचे महाव्यवस्थापक आणि परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक या हुद्दयांवर त्यांनी काम केले आहे.

 

त्यांच्या कार्यकाळात अमरावती परिमंडळ सातत्याने सर्वोच्च कामगिरी करणारे परिमंडळ ठरले. त्यांनी व्यवसाय विकासात लक्षणीय योगदान दिले. २००५ मध्ये शाखा व्यवस्थापकांच्या, तर २०१५ मध्ये प्रादेशिक व्यवस्थापकांच्या चेअरमन्स क्लबमध्ये नियुक्ती करून त्यांच्या अपवादात्मक दर्जाच्या सेवेची दखल घेण्यात आली.

 

एसबीआय जनरल इन्शुरन्स श्री. नवीनचंद्र झा यांच्या विस्तृत अनुभवाचा तसेच व्यवसाय कौशल्यांचा लाभ घेऊन अधिक यश मिळवण्यासाठी सज्ज आहे. एकंदर व्यवसाय धोरणे, कामकाज, बजेटिंग आणि धोरणात्मक वाढीवरील भर देण्याचे त्यांचे धोरण कंपनीच्या उद्योगक्षेत्राचे नेतृत्व करण्याच्या उद्दिष्टाशी तंतोतंत जुळणारे आहे.

 

मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग आणि ग्राहकाभिमुखता ही कोणत्याही कंपनीसाठी यशाची गुरूकिल्ली आहे, यावर श्री. झा यांचा ठाम विश्वास आहे. कर्मचाऱ्यांचे समाधान आणि ग्राहकांचा अनुभव या दोन्ही बाबींना प्राधान्य देण्यासाठी ते सातत्याने काम करत आले आहेत. ‘ग्रेट नंबर्स विथ एक्सलण्ट क्वालिटी (उत्कृष्ट दर्जासह उत्तम संख्यात्मकता)’हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. उत्तम वित्तीय निकाल साध्य करतानाच सेवेचे व कार्यात्मक उत्कृष्टतेचे मानक उच्च राखण्याप्रती त्यांच्या बांधिलकीतून हे दिसून येते. आपल्या सर्व ग्राहकांना ‘सुरक्षा और भरोसा दोनो’ पुरवण्यामध्ये यशस्वी ठरण्याच्या मार्गावर राहण्याच्या दृष्टीने श्री. झा यांचा विस्तृत अनुभव एसबीआय जनरल इन्शुरन्ससाठी मोलाचा ठरणार आहे.

 

 

Regards,

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments