Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorized-दुर्ग रायगडाचा इतिहास उलगडला

-दुर्ग रायगडाचा इतिहास उलगडला

-दुर्ग रायगडाचाइतिहास उलगडला…पुणे, ९ डिसेंबर- हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या रायगडावरील विविध घटना, प्रसंगांचा इतिहास कथन करतानाच गडाचे दरवाजे, गडावरील वाडे, बुरुज, बाजारपेठ, सदर, राजवाडा, राजसभा, नगारखाना, मनोरे या वास्तूंचे महत्त्व काय, त्यांची निर्मिती कशी झाली, त्यांचे वैशिष्ट्य काय, याचे दर्शन प्रभावीरीतीने घडवण्यात आले आणि रायगडाचा सारा इतिहासच श्रोत्यांसमोर उलगडला.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत ‘असा होता रायगड’ या विषयावरील पहिले पुष्प डॉ. रमा लोहोकरे यांनी गुंफले. डॉ. लोहोकरे यांनी यावेळी दुर्ग रायगडाची करून दिलेली ओळख श्रोत्यांना भावली. अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम यांनी या व्याख्यानमालेचे आय़ोजन केले आहे. उद्घाटन कार्यक्रमात शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात इतिहासाचे अभ्यासक प्रसाद तारे यांनी ‘असा झाला राज्याभिषेक’ या विषयावर सादरीकरण केले. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू त्यांनी उलगडून दाखवले.छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांना माहिती होण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी जे काम केले त्याला तोड नाही. ते एक आदर्श स्वयंसेवक होते, असे अॅड. जैन यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांचा इतिहास सर्वत्र पोहोचवण्याचे कार्य बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आता युवक-युवतींना माहिती करून देणे आवश्यक आहे, असे डॉ. दबडघाव म्हणाले.संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी प्रास्ताविक, विश्वस्त राजाभाऊ पानगावे यांनी संयोजन आणि नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.—-फोटो ओळीअक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम यांच्यातर्फे आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रसाद तारे, डॉ. प्रवीण दबडघाव, डॉ. रमा लोहोकरे, सुनील राऊत, अॅड. एस. के. जैन आणि शिरीष किराड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.—

Previous article
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे स. ११.०० वा. राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष मा. श्री.अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज हा देश एकसंघ आहे, त्यामुळे अनेक जाती धर्मांचे लोक गुणागोंविदाने एकत्र नांदताना दिसतात ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या भारतीय संविधाना मुळेच..! असे थोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागरास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्यावतीने अभिवादन करतो. तसेच प्रदेश सरचिटणीस ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनाचा आढावा समस्त जनांसमोर मांडला, बाबासाहेबांची आंबेडकरी लोकशाही जगाचे तत्वज्ञान ठरलेली असून, पुढे देश प्रगती पथावर घेऊन जाण्याकरिता आंबेडकरांचे विचाराच देशाला तारक ठरतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले,यावेळी शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष गंगा धेंडे, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, खजिनदार दिपक साकोरे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, पर्यावरण सेल अध्यक्ष विनय शिंदे, झोपडपट्टी विभाग अध्यक्ष संतोष निसर्गध, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, महिला शहर कार्याध्यक्ष उज्वला ढोरे, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे, व्ही.जे.एन.टी. सेल महिला अध्यक्ष निर्मला माने, महिला प्रदेश सरचिटणीस शोभा पगारे, तेजस सिंह, पिंपरी विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष अबरार शेख, भोसरी विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष अथर्व कोकणे, उपाध्यक्ष संदिपान झोंबाडे, कुमार कांबळे, उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, सरचिटणीस रवींद्र सोनवणे,उदय ववले, वॉर्ड अध्यक्ष रिजवाना सय्यद, शेनाज जकाते, जावेद जकाते, प्रथमेश कांबळे, मकरंद शिंदे, मनिष शेडगे, समर्थ गव्हाणे, चैतन्य सोनवणे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यांदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments