विमान नगर, नगर रोड पुणे, येथील फिनिक्स मार्केटसिटीमध्ये मॉलच्या प्रसाधनगृहात अवैधपणे ड्रग्ज घेत असलेल्या दोन व्यक्तींच्या वायरल झालेल्या व्हिडिओबद्दल आम्हाला कल्पना आहे. आमच्या असे निदर्शनास आले आहे की, आमच्या परिसराशी चुकीच्या पध्दतीने अनेक रिपोर्ट्सनी या घटनेला जोडले आहे. सखोल तपासणी आणि आमच्या अंतर्गत टीमसोबत केलेल्या सल्लामसलतीनंतर, आम्ही याची पुष्टी करु शकतो की व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रसाधन गृहाची सजावट आणि डिझाइन विमान नगर, नगर रोड पुणे, येथील फिनिक्स मार्केटसिटीच्या कोणत्याही प्रसाधनगृहाशी जुळत नाहीत. त्यामुळे आम्ही निर्णयात्मक स्वरुपात असे सांगू शकतो की, हा व्हिडिओ आमच्या मॉलमध्ये शूट झालेला नाही.
विमान नगर, नगर रोड पुणे, येथील फिनिक्स मार्केटसिटी अवैध सामुग्रीच्या वापराचा ठोसपणे विरोध करते. आमची धोरणे आणि कार्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी सुरक्षित व सेक्युअर वातारवणाची शाश्वती देतात. आमची सिक्युरीटी टीम उच्च स्तरावर सतर्क असून आमच्या परिसरात कोणत्याही अवैध कार्याला टाळण्यासाठी नियमितपणे छाननी करते. आम्ही प्रत्येकासाठी सुरक्षित आणि आनंददायी खरेदी अनुभूती कायम ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व अनिवार्य नियम व नियमनांचे काटेकोरपणे पालन करतो.
प्रसार होत असलेल्या चुकीच्या माहितीबद्दल आणि आमच्या मॉलला अशा कृतींमध्ये गोवले जाण्याची आम्हाला मनस्वी काळजी वाटत आहे. आम्ही सर्व मीडिया आउटलेट्सना, सोशल मीडियावरील सर्व व्यक्तींना माहिती देण्याआधी सर्व तथ्यांची पडताळणी करण्याची विनंती करत आहोत. छाननी न केलेल्या माहितीच्या प्रसारामुळे आमच्या प्रतिष्ठेची क्षती होऊ शकते आणि आमच्या सहकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.
विमान नगर, नगर रोड पुणे, येथील फिनिक्स मार्केटसिटी सुरक्षित, फॅमिली फ्रेंडली वातावरण देण्यासाठी वचनबध्द आहे. आमच्या ठोस सुरक्षा उपाययोजनांचा त्याचप्रमाणे आमच्या ग्राहकांच्या आमच्यावर असलेल्या विश्वासाबद्दल आम्हाला गर्व आहे. आम्ही लोकांना कोणत्याही शंकास्पद कृतींची आमच्या सुरक्षा टीमला तात्काळ माहिती देण्याची विनंती करत आहोत, ज्यामुळे आम्हाला सर्वांसाठी सुरक्षित वातावरण राखण्यात मद
त मिळेल.


