Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedद्युम्ना वूमेन्स क्लिनिक मधील वैद्य विनिता बेंडाळे यांनी चिकित्सा केलेल्या रुग्णाचा केस...

द्युम्ना वूमेन्स क्लिनिक मधील वैद्य विनिता बेंडाळे यांनी चिकित्सा केलेल्या रुग्णाचा केस रिपोर्ट आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित

पुणे ता २१ जून २०२४ : पुण्यातील द्युम्ना वूमेन्स क्लिनिक मधील वैद्य विनिता बेंडाळे यांनी चिकित्सा केलेल्या रुग्णाचा केस रिपोर्ट जर्नल ऑफ रिप्रॉडक्शन अँड इन्फर्टिलिटी या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकाने प्रकाशित केला आहे. एक ४४ वर्षांचा पुरुष रुग्ण द्युम्ना वूमेन्स क्लिनिक मध्ये स्पर्म डीएनए फ्रॅगमेनटेशन असा रिपोर्ट घेऊन आला. आयुर्वेदानुसार त्या रुग्णाची संपूर्ण इतिहास जाणून आयुर्वेद चिकित्सा करण्याचे ठरले. त्याच्यावर आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार शुक्र धातूंमधील विकृतीवर चिकित्सा करून रसायन औषधे व बस्ती चिकित्सा दिली व रुग्णाला केवळ चार महिन्याच्या चिकित्सेने यश मिळाले. त्याचे एसडीएफ ची तपासणी चार महिन्यांच्या चिकित्सेनंतर पुन्हा केली असता रिपोर्ट स्पर्म मधील विखंडन प्रक्रिया दुरूस्त झाल्याचे आढळून आले.

 

वंध्यत्व ( मुल न होणे ) ही एक गंभीर समस्या जगभर असुन जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवाडीनुसार सहापैकी एका जोडप्याला मुल होत नाही ( १७.५%) . मुलं न होण्याच्या कारणांमध्ये पुरुषांमध्ये दोष असण्याचे प्रमाण साधारण २० ते ३५% असते. स्पर्म डीएनए फ्रॅगमेनटेशन ( एसडीएफ ) म्हणजे शुक्राणूंच्या डीएनए मध्ये विखंडन होणे हे पुरूष वंध्यत्वाच्या कारणांमधील एक कारण आहे. एसडीएफ मुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यामध्ये अडचण येणे, वारंवार गर्भस्त्राव होणे, एआरटी च्या यशाचे प्रमाण कमी होणे अशा स्वरूपाच्या अडचणी येऊ शकतात. शास्त्रज्ञांच्या मते एसडीएफची संभाव्य कारणे अॅाक्सिडेटिव स्ट्रेस , पुरुष प्रजनन संस्थेमध्ये शोथ , वेरिकोसिल, अथवा जंतुसंसर्ग होय . सध्या त्यावर उपलब्ध असणारी चिकित्सा म्हणजे तोंडावाटे अँटिऑक्सिडंटच्या गोळ्या , वेरिकोसिल शस्त्रक्रियेने रिपेअर करणे, प्रतिजैविके यांचा वापर व स्पर्म निवडीवर आधारित असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ( एआरटी ) चिकित्सा होय.विविध चिकित्सा करूनही बहुतेकवेळा अपयश येते आणि अशा रुग्णांना मूल होणे दुरापास्त होते.

 

वैद्य विनिता बेंडाळे म्हणाल्या ‘ वंध्यत्वावर चिकित्सा करत असताना रुग्णाच्या मानसिक स्थितीचाही विचार करून , आहार व जीवनशैली मध्ये योग्य बदल केले तर लवकर यश मिळणे सोपे जाते. महत्वाचे म्हणजे आम्ही जी औषधे वापरतो ती संशोधनाच्या कसोटीवर तपासून सुरक्षित आहेत हे सिद्ध झाले आहे. गेली ३० वर्ष आम्ही ही आयुर्वेदीय रसायन चिकित्सा वापरत आहोत.

 

या केस रिपोर्ट मधे वैद्य श्री लक्ष्मी चागंटी, वैद्य ऋतूजा पांडव, वैद्य दीपाली पवार यांचाही सहभाग होता.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments