पुणे शहरातील समान पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण व्हायचे आहे
महापालिकेमध्ये 34 गावांचा समावेश झाला आहे
शिक्षण आणि आयटी व्यवसायामुळे फ्लोटिंग पोपुलेशन मोठे आहे
शिवाय 20 टक्के पाणी गळती होते
पुणे शहराला वीस टीएमसी पेक्षा जास्त पाणी मिळणे आवश्यक आहे
अतिरिक्त पाणी वापर केला म्हणून शासनाने दंड केला आहे
मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी द्यावे
आणि सावंतवाडी कात्रज येथे लघु पाटबंधारे यांनी आणि महापालिकेने सर्वेक्षण केले असून अर्धा टीएमसी पाणी पुणे शहराला उपलब्ध होऊ शकते
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले
अतिरिक्त पाणी वापराबद्दल कायद्यानुसार दंड केला आहे. परंतु तो या आधी ही वसूल केलेला नाही
मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याबाबत लवादाच्या निर्णयानुसार कार्यवाही करू
भिलारेवाडी, कात्रज येथे अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध होत असेल तर ते घेणे शक्य आहे का यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागाला तातडीने सर्वेक्षण करण्यास सांगून कार्यवाही करू


