कोरियन पॉप कल्चरवर आधारित दृश्य आणि संगीतावर आधारित पॅकेजिंगची मर्यादित आवृत्ती
राष्ट्रीय ४ जुलै २०२४- हॅलो के-फॅन्स, नवीन के-पॉप आयडॉल आला आहे.
केएफसी मध्ये कोरियन संस्कृतीची लाट आली आहे. केएफसीमध्ये कोरियन चिकन पॉपकॉर्न हा नवीन पदार्थ आणण्यात आला आहे. हा अतिशय चविष्ट आणि केएफसीच्या दर्जाला साजेसा आहे.
कोरियन पदार्थाच्या फ्लेवर्सने प्रेरित या पॉपकॉर्नमध्ये कोरियाची अशी एक वेगळी ओळख दडली आहे. भारत आणि भारताच्या शेजारी देशांमध्ये ती आता उपलब्ध होणार आहे. कोरियन चिकन पॉपकॉर्न मध्ये फायरी चिली, सेव्हरी सॉय, क्रंची सिसम, असे क्लासिक कोरियन साहित्य आणि फ्लेव्हर्स आहेत.
केएफसीने या पॉपकॉर्नची मर्यादित आवृत्ती बाजारात आणली आहे. कोरियातील काही दृश्यं आमि संगीत याचा मिलाफ साधून पॅकेजिंग केलं आहे आणि ते काही मर्यादित आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहे. याची रचना रंगीबेरंगी आणि चकचकीत आहे. त्यात चेरी ब्लॉसम आणि गिटारमधील काही स्वर, त्याबरोबरच डिस्को लाईट असं के-पॉपला साजेशा गोष्टी आहेत. बॉक्सवर कोरियन आर्किटेक्चर, फॅन्स, आणि पिंक क्लाऊड्स तसंच एका विशिष्ट शैलीतलं सुलेखन आहे.
हे पॉपकॉर्न १०९ रुपयापासून काही मर्यादित काळापर्यंत बंगलोर आणि मुंबई येथे मिळतील. केएफसी के पॉप कोरियन चिकन पॉपकॉर्न वेगवेगळ्या आकारमानात उपलब्ध आहे.
मग वाट कशाची पाहताय? तुमच्या जवळच्या केएफसीमध्ये जा किंवा केएफसी अप किंवा वेबसाइट (www.online.kfc.in) वरून ऑफर असेपर्यंत ऑर्डर करा. केएफसी अप वरून मोफत डिलिव्हरीचा पर्यायही उपलब्ध आहे.


