Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedफ्रँकलिन टेम्पलटनने सुरू केला फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंड फंडाचे उद्दीष्ट...

फ्रँकलिन टेम्पलटनने सुरू केला फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंड फंडाचे उद्दीष्ट असेल मिड आणि स्मॉल कॅप्सची वाढ व लार्ज कॅप्सची सापेक्ष स्थिरता प्रदान करणे बॉटम-अप क्यू.जी.एस.व्ही स्टॉक पिकिंग फ्रेमवर्क असून योग्य कल्पना शोधण्यासाठी गुणवत्ता, वाढ, शाश्वतता आणि मूल्यांकन यांच्यावर जोर देते

मुंबई, 4 जुलै, 2024 : फ्रँकलिन टेम्पलटन (भारत) यांनी फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंड (एफ.आय.एम.सी.एफ) नावाचा ओपन एंडेड मल्टी कॅप डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड सुरू करण्याचे जाहीर केले आहे. या फंडाचे उद्दिष्ट असेल दीर्घकालीन भांडवल मूल्य निर्माण करणे आणि लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून ते साध्य केले जाणार आहे. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा प्रत्येक मार्केट कॅप श्रेणीत एफ.आय.एम.सी.एफ आपल्या एकूण मालमत्तेच्या किमान 25% गुंतवणूक कायम ठेवणार आहे आणि हे नियामक आवश्यकतांच्या अनुषंगाने असेल. अंतर्गत फ्रेमवर्कच्या आधारे उर्वरित 25% सर्वात इष्टतम मार्गाने एकरूप केले जातील. 8 जुलै 2024 रोजी नवीन फंड ऑफर सुरू होईल आणि 22 जुलै 2024 रोजी बंद होईल व यादरम्यान रु.10/- प्रति युनिट दराने युनिट्स उपलब्ध असतील.

 

जानकीरमण आर, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर – इमर्जिंग मार्केट्स इक्विटी-इंडिया, फ्रँकलिन टेम्पलटन यांनी फंडची सुरुवात आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या धोरणाबद्दल बोलताना सांगितले की, “मजबूत मॅक्रो फंडामेंटलमुळे भारताची अर्थव्यवस्था मध्यम कालावधीत मजबूत वाढीसाठी सज्ज झाली आहे आणि त्याद्वारे महागाईचा कल, विवेकी वित्तीय धोरणे आणि राजकीय स्थैर्य सुधारले आहे. कोव्हिडनंतर उज्ज्वल वाढीच्या दृष्टीकोनामुळे शेअर बाजारात दमदार कामगिरी पहायला मिळाली आहे. विविध बाजार क्षेत्रांमधील वाढीला खेचून आणण्यासाठी एफ.आय.एम.सी.एफ ची रचना केली गेली असून हे विशेषत: स्मॉल आणि मिड कॅप क्षेत्रासाठी केले गेले आहे, जी पारंपारिक इक्विटी फंडांमध्ये बऱ्याचदा कमी प्रतिनिधित्व असलेली क्षेत्रे आहेत. दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांना आमच्या मल्टी कॅप फंडात सहभागी होणे फायदेशीर ठरू शकते ज्यात प्रत्येक मार्केट कॅपसाठी डेडिकेटेड बकेट्स असतात आणि वेळेवर पुनर्संतुलन मिळविले जाते जेणेकरून व्यापक वैविध्य सुनिश्चित करता येईल.”

 

या फंडाची सुरुवात करण्याप्रसंगी बोलताना अविनाश सातवळेकर, अध्यक्ष, फ्रँकलिन टेम्पलटन-इंडिया म्हणाले की, “आमच्या इक्विटी टीमच्या 30 वर्षांहून अधिक काळ भारतातील इक्विटीचे व्यवस्थापन करण्याच्या व्यापक अनुभवाचा फायदा घेणारी आमची नवीन मल्टी कॅप रणनीती सादर करण्याची उत्सुकता आम्हाला लागली आहे. भारताची भक्कम लौकिक विकास क्षमता लक्षात घेता, विविध क्षेत्रे आणि मार्केट कॅप श्रेणींमध्ये अनेक संधी निर्माण होताना दिसू लागल्या आहेत. लवचिक परंतु शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून या उभरणाऱ्या संधींचा फायदा घेण्यासाठी एफ.आय.एम.सी.एफ ने स्वत:चे स्थान निश्चित केले आहे आणि तगडे वैविध्य शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक आदर्श निवड आहे.”

 

फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंडाचे उद्दिष्ट असे उत्पादन तयार करणे आहे जे दोन्ही जगातील सर्वोत्तम उपलब्ध करून देऊन त्याद्वारे उच्च वाढीचे स्मॉल आणि मिडकॅप विश्वाला तुलनेने स्थिर लार्ज कॅप विश्वासह एकरूप करते. या पोर्टफोलिओ मध्ये प्रत्येक क्षणी लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपमध्ये प्रत्येकी किमान 25% वाटप राखले जाणार आहे आणि उर्वरित 25% चे वाटप अंतर्गत फ्रेमवर्कचा वापर करून इष्टतम मार्गाने केले जाणार आहे. ऊर्जा संक्रमण, बचतीचे आर्थिकीकरण, अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण, डिजिटल कंपन्यांकडून अडथळा, उत्पादन पुनरुज्जीवन यासारख्या पोर्टफोलिओमधील संभाव्य संधीसाधू केंद्रविषयांना हा फंड पकडण्याचा प्रयत्न करू शकतो. या केंद्रविषयांमध्ये आणि सेक्टर्स मध्ये योग्य कल्पना शोधण्यासाठी बॉटम-अप क्यू.जी.एस.व्ही स्टॉक पिकिंग फ्रेमवर्क लागू करणार असून गुणवत्ता, वाढ, शाश्वतता आणि मूल्यांकन यांच्यावर जोर दिला जात आहे.

 

फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप फंडाबद्दल अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

 

 

 

एनएफओ ची वैशिष्ट्ये

फंडचे वर्णन

मल्टीकॅप (डायव्हर्सिफाइड इक्विटी) फंड

योजनेचा प्रकार

लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्स यांच्यात गुंतवणूक करणारी ओपन एंडेड स्कीम.

गुंतवणुकीचे उद्दिष्ट :

 

 

या योजनेचा गुंतवणुकीचा उद्देश दीर्घकालीन भांडवल वृद्धी निर्माण करणे हा आहे आणि हे लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून साध्य केले जाणार आहे. योजनेचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईलच याची खात्री नाही.

एनएफओ च्या तारखा

8 जुलै 2024 रोजी आणि 22 जुलै 2024 रोजी बंद होईल

सतत विक्रीसाठी आणि पुन्हा खरेदी करण्यासाठी योजना पुन्हा सुरू होण्याची तारीख

जुलै 31, 2024

याद्वारे व्यवस्थापित केले जात आहे

आर. जानकीरमण, किरण सेबेस्टियन, अखिल कल्लूरी, संदीप मनम (परदेशी सिक्युरिटीजसाठी समर्पित फंड मॅनेजर)

गुंतवणुकीची शैली

‘ग्रोथ’ आणि ‘व्हॅल्यू’ एकरूप करणे

किमान रक्कम

सब्स्क्रिप्शन : ताजी खरेदी – रु.5,000/-. अतिरिक्त खरेदी – रु.1,000/-. रिडेम्प्शन: रु.1,000/-. वर निर्दिष्ट केलेल्या किमान रक्कमपेक्षा जास्त सब्स्क्रिप्शनची आणि रिडेम्प्शनची रक्कम ही रु. 1/- च्या गुणाकारात कोणतीही रक्कम असेल.

मापदंड (बेंचमार्क)

निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 इंडेक्स

एक्झिट लोड

1.00% – वाटपाच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत किंवा त्यापूर्वी रिडिम केल्यास

शून्य – वाटपाच्या तारखेपासून 1 वर्षानंतर रिडिम केल्यास

 

 

अधिक माहितीसाठी www.franklintempletonindia.c

om वर उपलब्ध योजना माहिती दस्तऐवज पहा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments