Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवीन मराठी शाळेत कृषी दिन साजरा

नवीन मराठी शाळेत कृषी दिन साजरा

 

नवीन मराठी शाळेत कृषी दिनानिमित्त बागेत हळदीचे व अळूचे कंद लावण्यात आले. ऑफिस टाईम, स्पायडर प्लांट, स्नेक प्लांट, टर्टल टेल, पर्पल हार्ट यासारखी शोभेची रोपे विद्यार्थांना भेट देण्यात आली. ही रोपे नारळाची करवंटी, जुने प्लास्टिकचे डबे, मातीचे छोटे छोटे माठ, अशा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंमध्ये लावण्यात आली होती. मुलांना या कुंड्या देऊन आकर्षक सजावट करण्यास सांगितले आहे. तसेच त्या रोपाची काळजी घेऊन रोप वाढल्यावर त्याची फांदी इतर मुलांना देण्यास सांगितले आहे. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री हजारे, तनुजा तिकोने, धनंजय तळपे यांनी संयोजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments