Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदान केंद्र उपलब्ध होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*

मतदान केंद्र उपलब्ध होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*

 

 

पुणे, दि. ४: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने शहरातील समूह इमारतींमध्ये तसेच निवासी गृहरचना संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यावर भर दिला असून असे मतदान केंद्र स्थापित करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले आहे.

 

आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ घोषित केला आहे. त्या अनुषंगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम या राष्ट्रीय महत्वाच्या कार्यक्रमामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांनी सहकार्य करावे. रहिवाशांसाठी निवासाच्या जवळ आणि सोयीच्या ठिकाणी मतदान केंद्र उपलब्ध होण्याच्यादृष्टीने, गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे.

 

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या २२ ऑगस्ट २०१२ रोजीच्या परिपत्रकानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेतील मतदार नोंदणीस पात्र होणारे रहिवासी, सोसायटीतील जागा सोडून गेलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती यांची यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पुरवावी. त्याचप्रमाणे सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांनी सोसायटीतील रहिवाशांना मतदार नोंदणी व दुरुस्ती करुन घेण्याबाबत आवाहन करावे.

 

गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेत मतदान केंद्र सुरू करण्याकरिता आपल्या गृहनिर्माण संस्थेचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, अंदाजित मतदार संख्या इत्यादी माहितीसह आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या http://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील https://forms.gle/twLTGpjzzy2x9eV36 व https://forms.gle/z261Ah4DDgQxSEvs9 या गुगल लिंकवर आपला अर्ज भरता येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments