राष्ट्रीय, ११ जुलै २०२४ – इंडकल टेक्नॉलॉजीज या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीने आज आपल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि अद्वितीय उत्पादनांसाठी ओळखल्या गेलेल्या जागतिक ख्यातीच्या एसर इन्कॉर्पोरेटेडसोबत ट्रेडमार्क लायसन्सिंग करारनाम्याअंतर्गत स्मार्टफोन बाजारपेठेत प्रवेशाची घोषणा केली. या करारनाम्यानुसार इंडकल भारतात एसर ब्रँडअंतर्गत स्मार्टफोन्स डिझाइन, उत्पादन आणि वितरण करेल. ही धोरणात्मक भागीदारी भारतीय बाजारपेठेत एसर ब्रँडेड स्मार्टफोन आणणार असून नावीन्यपूर्णता व विस्ताराचे एक नवीन युगही आणणार आहे.
इंडकल टेक्नॉलॉजीज २०२४च्या मध्यावर एसर ब्रँड अंतर्गत विविध प्रकारचे स्मार्टफोन मॉडेल्स आणणार आहे आणि वेगाने व्याप्ती तसेच बाजारातील वाटाही वाढवेल. हे प्रयत्न एसर ब्रँडची शक्ती आणि इंडकलची भारतीय ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने देण्याची वचनबद्धता अधोरेखित करतात आणि त्यात नावीन्यपूर्ण तपशील, अद्ययावत हार्डवेअर व नवीन सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचाही समावेश आहे.
या उद्यमाद्वारे एक मोठा संगणक ब्रँड स्मार्टफोनच्या बाजारपेठेत येत असून या क्षेत्राच्या प्रचंड वाढीच्या क्षमतेला अधोरेखित करणारा आहे. या स्मार्टफोन्सची किंमत १५,००० ते ५०,००० रूपयांच्या घरात असून त्यामुळे आता या बाजारपेठेत मोठी स्पर्धा पाहायला मिळेल.
एसर ब्रँडेड स्मार्टफोन्सचे उत्पादन भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमानुसार भारतात केले जाईल. हे फोन इ-वाणिज्य प्लॅटफॉर्म्स आणि देशभरातील ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्येही खरेदीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे ग्राहकांना ते सहजपणे उपलब्ध होती
ल.


