Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या अध्यक्ष पदी डॉ. मंदार अंबिके

रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या अध्यक्ष पदी डॉ. मंदार अंबिके

 

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ च्या अध्यक्ष पदी डॉ.मंदार अंबिके यांची नियुक्ती झाली आहे. सिंबायोसिस मेडिकल कॉलेजचे असोसिएट डीन म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.

 

टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंबायोसिस मेडिकल विभागाचे प्रमुख डॉ.राजीव येरवडेकर होते. रोटरी ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, माजी प्रांतपाल अरुण कुदळे, मोहन पलेशा, प्रमोद जेजुरिकर, डॉ. महेश कोटबागी, शिवाजी मराठा संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

मावळते अध्यक्ष रवींद्र प्रभुणे यांच्याकडून डॉ. मंदार अंबिके यांनी पदभार स्वीकारला. हेमंत वाळिंबे यांनी मावळते सचिव किरण वेलणकर यांच्याकडून पदभार स्वीकारला.

 

डॉ. मंदार अंबिके म्हणाले, रोटरी क्लब ऑफ पुणे साउथच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबविले जातात. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दुर्बल घटकातील लोकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विशेष उपक्रम करण्यात येतील. तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग , पर्यावरण पूरक बांबू ब्रश असे अनेक प्रकल्प आगामी काळात होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments