Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅम्प प्राथमिक मराठी शाळेत गुरुपौर्णिमा निमित्ताने मातृ पूजन उत्साहात संपन्न

कॅम्प प्राथमिक मराठी शाळेत गुरुपौर्णिमा निमित्ताने मातृ पूजन उत्साहात संपन्न

पुणे, २२ जुलै २०२४ : कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्प प्राथमिक मराठी शाळा, महात्मा गांधी रोड येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने मातृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे औक्षण करून पूजन केले. यावेळी मातांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिला आणि या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी कार्यक्रमाला मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा जाधव,ज्येष्ठ शिक्षिका सौ.सुवर्णलता समुद्रे, प्रकाश आटोळे, विश्वनाथ कुंभार, भाऊ काळे, दिपाली पवार,अपर्णा यादव, सविता सोलापुरे, जया चपटे, सारिका बोरूळ,श्रीमती सुप्रभा सूर्यवंशी,सौ.अंजली अरळी,सौ कल्पना रणशिंग आदी शिक्षक उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेच्या वतीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा जाधव म्हणाल्या की, गुरुपूजन म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. प्रत्येकाचा जीवनातील पहिला गुरू म्हणजे आई. आपल्या आईविषयी कृतज्ञता म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कॅम्प प्राथमिक मराठी शाळेमध्ये मातृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व या विषयावर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी ‘गुरूने दिला ज्ञानरुपी वसा’ हे गीत सादर केले. तसेच आयुष पवार (इयत्ता तिसरी),सई कामठे,मंगेश ढोंडगे,अनुराधा जगदाळे,श्रवण देवकर (इयत्ता चौथी) या विद्यार्थ्यांनी आपल्या जीव‌नातील गुरूंचे महत्व मनोगतातून सांगितले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ललिता काची यांनी के

ले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments