मुंबई, 03 जानेवारी 2024: झुनो जनरल इन्शुरन्स हा नवीन जमान्याचा डिजीटल इन्शुरर असून त्यांच्या वतीने अत्याधुनिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी – झुनो हेल्थप्लस पॉलिसी सादर करण्यात आली आहे. ही नावीन्यपूर्ण आरोग्य विमा योजना किफायतशीर प्रीमियमवर व्यक्ती तसेच कुटुंबांसाठी व्यक्तीच्या गरजेनुरूप कवच आणि लाभ उपलब्ध करून देते.
महागाईच्या दृष्टीने समायोजित स्वरुपाचे हे उत्पादन असून एका पॉलिसी अंतर्गत कुटुंबातील 9 सदस्यांना विमा कवच उपलब्ध करून देण्यात येते, त्यामुळे अनेक पॉलिसींचे व्यवस्थापन करावे लागत नाही.
झुनो हेल्थप्लस पॉलिसी विविध गरजा पूर्ण करते, व्यक्ती आणि कुटुंबांना विमा कवचाकरिता 20 भिन्न संबंधांमधून निवडण्याची परवानगी देते. उत्पादन ज्यामध्ये बॅचलर व्यक्ती बेसिक हेल्थ इन्शुरन्स काढू शकतो आणि साहसी क्रीडा पर्यायी कवचाची निवड करू शकतो. तरुण जोडपे मातृत्व लाभ आणि नवजातसंबंधी कवच म्हणजेच मॅटर्निटी बेनिफिट अँड न्यू बॉर्न कव्हरसह योजना घेऊ शकतात. वाढत्या वंध्यत्वाकडे पाहता, इच्छुक जोडपी इनफर्टीलिटी अँड सरोगसी कव्हरची निवड करू शकतात. मुले असलेले कुटुंब आऊटपेशंट आणि वर्ल्डवाईड कव्हरची निवड करू शकतात. विमा काढताना कमाल वयोमर्यादा नसल्याने ही पॉलिसी ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा कवच देऊ करते.
या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, कंपनीची विमा उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचावी यादृष्टीने, पॉलिसीधारक त्यांच्या भौगोलिक स्थानावर आधारित 20% क्षेत्र-आधारित सवलतीचा आनंद घेऊ शकतात. याव्यतिरिक्त, पॉलिसी 10% पर्यंत दीर्घकालीन सूट देते आणि विद्यमान ग्राहकांना ही पॉलिसी खरेदी करण्यावर 5% सवलत देऊन प्रोत्साहन देते. एवढेच नव्हे तर तुम्ही आमच्या वेबसाइटवरून थेट खरेदी केल्यास तुम्हाला 15% सवलत देखील मिळेल.
नवीन पॉलिसी लॉन्चची घोषणा करताना, झुनो जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ शानाई घोष म्हणाल्या, “झुनो हेल्थप्लस पॉलिसी आमची नवकल्पना आणि ग्राहक-केंद्रित उपायांबद्दलची वचनबद्धता दर्शवते. आमचा विमा सोपा, समजण्यास सुलभ आणि सर्वांसाठी सुसह्य बनविण्यावर विश्वास आहे. झुनो हेल्थप्लस पॉलिसी हे त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. अधिक रकमेचा विमा, रूम रेंट कॅपिंग नाही, आधुनिक उपचार आणि सर्वसमावेशक कव्हरेजसह कोणतेही सबलिमिट किंवा रोगनिहाय कॅपिंग नाही, तो केवळ एक विमा नसून ही मनःशांती आहे”.
नवीन धोरण प्रामुख्याने त्याच्या चॅनेल पार्टनर नेटवर्कद्वारे प्रवेशयोग्य असेल. झुनो हेल्थप्लस पॉलिसी त्याच्या ग्राहकांना वैद्यकीय तपासणीचा लाभ देते. 55 वर्षे वयोगटातील अत्यंत टोकाच्या आरोग्याच्या स्थितीशिवाय 20 लाखांपर्यंतच्या कवचासाठी कोणतीही वैद्यकीय चाचणी होणार नाही.
झुनो हेल्थप्लस पॉलिसी गुंतागुंत-मुक्त आरोग्य देखभाल पर्याय 10,000 हून अधिक कॅशलेस हॉस्पिटलच्या विस्तृत नेटवर्कवर देते. आपतकालिन स्थितीत, हे विस्तृत जाळे सुविधाजन्य पर्याय शोधण्याच्या कटकटीपासून पिच्छा सोडवते. जर एखादप्रसंगी नेटवर्क-व्यतिरिक्त रुग्णालयात भरती करण्याची वेळ आल्यास झुनो कॅशलेस सुविधा ऑनबोर्ड देते. प्रतिपूर्ती दाव्यांसाठी, झुनो “कॅश इन अॅडव्हान्स” सुविधा देते, जिथे झुनो आपतकालीन परिस्थितीत तत्काळ मदत पुरवणाऱ्या ग्राहकाला आगाऊ पैसे देते. 24 x 7 क्लेम्स कॉन्सिअर्ज संपूर्ण दाव्याच्या प्रक्रियेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रदान करते. ज्यामुळे पॉलिसीधारकांना तत्पर आणि अखंड समर्थनाची खात्री करून ग्राहकांना तणावमुक्त अनुभव मिळतो.
झुनो जनरल इन्शुरन्स’ला आत्मविश्वास वाटतो की झुनो हेल्थप्लस पॉलिसी आरोग्य विमा उत्पादनांसाठी नवीन मानक सिद्ध करेल, ज्यामध्ये नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह किफायतशीर उत्पादने तसेच ग्राहक-केंद्री पद्धत समाविष्ट असेल. झुनो हेल्थप्लस पॉलिसी आणि अन्य विमा उत्पादनांशी निगडीत अधिक माहितीकरिता कृपया आमची वेबसाईट https://www.hizuno.com/ ला भेट द्या.
—


