Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedआर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी दिला नऱ्हे कडे बघण्याचा नवा दृष्टिकोन विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी...

आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी दिला नऱ्हे कडे बघण्याचा नवा दृष्टिकोन विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे लोक प्रदर्शन

पुणे : नऱ्हे हा परिसर विभिन्नतेने भरपूर असून, त्यामध्ये स्वतंत्र असे अस्तित्व असलेले विविध उपक्षेत्र आहेत. नऱ्हेचा विकास एकांगी न होता, त्यातील विविध उपक्षेत्रातील लोकांच्या गरजा जाणून घेऊन बहुआयामी पद्धतीने झाला पाहिजे, असा निष्कर्ष विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी लोकप्रदर्शनाच्या माध्यमातून मांडला.

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या ४ थ्या वर्षाचे विद्यार्थी व शिक्षक, पुण्याच्या सीमेवरील शहरीकरणासंदर्भामधील विविध क्रिया, प्रक्रिया तसेच वाढ यांचा अभ्यास गेली ७ वर्षे करत आहेत. या प्रकारची शहराची वाढ हि केवळ ‘उपनगराचा विस्तार’ नसून ‘शहरीकरणाचे विविध प्रकार या वाढीत दिसून येत आहेत.

इंडस्ट्रिअल विभाग तसेच स्वामीनारायण मंदिर म्हणजे नऱ्हे. परंतु विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी, विविध विषयांवर सखोल अभ्यास करून, नऱ्हेकडे नवीन दृष्टीने बघण्यास अवगत केले, यासाठी मध्यवर्ती भागातील श्री भैरवनाथ मंदिराशेजारी लोक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध पैलूंचा केलेला अभ्यास पॅनल्सच्या माध्यमातून सादर केला. यामध्ये नऱ्हेची प्रतिमा, ओळख आणि संस्कृती; दळण-वळण आणि वाहतूक सुविधा; सामाजिक सुविधा; पर्यावरण, भवताल आणि भु-स्वरूप; वास्तुशैली, सामाजिक वर्तन आणि सुरक्षा; उपजीविका, जीवनशैली आणि अर्थव्यवस्था अश्या पैलूंचा समावेश होता. स्थानिकांना तसेच विविध भागधारकांना विद्यार्थ्यांनी नऱ्हे येथील परिसराची अभ्यास पूर्ण माहिती करून दिली. लोकांनीही त्यांचे प्रश्न, समस्या अणि होणाऱ्या विकासाबद्दल त्यांचे मत विद्यार्थ्यांना सांगितले.

महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी ट्रॅफिक आणि स्वच्छता या विषयावर नऱ्हेमधील लोकांसमोर पथनाट्य सादर केले, ज्याकरिता लोकांचा आणि शालेय विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या अभ्यासात विद्यार्थ्यांना, महाविद्यालयातील प्राध्यापक हृषीकेश अष्टेकर, देवेंद्र देशपांडे, गरिमा बुरागोहैन, गुंजन माहेश्वरी, मीनाक्षी सरावगी, केतन नानल व राजेंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्ये प्राचार्य आर्किटेक्ट प्रसन्न देसाई अणि समन्वयक आर्किटेक्ट शेखर गरुड यांनी या अभ्यासात तसेच उपक्रमात महत्त्वाची दिशा दिली.

या कार्यक्रमात, नऱ्हे येथील उप सरपंच सुशांत कुटे, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष डॉ.सुधाकर जाधवर,उपाध्यक्ष ॲड.शार्दुल जाधवर,श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्ट नऱ्हेचे सदस्य,नऱ्हे ग्रामपंचायत समितीचे सदस्य तसेच जिल्हा परिषद उच्च प्रार्थमिक शाळेच्या प्राध्यापिका सुकेशनी कोल्हे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न देसाई आणि शेखर गरुड उपस्थित होते.

विवेकानंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्ट या संस्थेचे विश्वस्त व सचिव जितेंद्र पितळीया, चेअरमन ॲड.अभय छाजेड हे या कार्यक्रमात उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व प्राध्यापक अणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments