Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन*

संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन*

*

पुणे दि. : कोरेगाव पार्क येथे संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी पुणे शहरात खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वसतीगृहासाठी १० ते १५ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या खाजगी इमारतीची आवश्यकता आहे. या इमारतींमध्ये किमान १५ ते २० खोल्या, १० शौचालये, १० स्नानगृहे, वीज, पिण्याचे पाणी, पाणी साठवणुकीची सोय आदी सर्व पायाभूत सुविधा, तसेच इमारतीच्या भोवती संरक्षक भिंत असावी.

इच्छुकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हेक्षण क्रमांक १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर समोर, येरवडा, पुणे-६ (दूरध्वनी ०२०-२९७०६६११) किंवा ८४८४८९६६७२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments