Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedऋता दुर्गुळेने डिस्नी+ हॉटस्‍टारची सिरीज 'कमांडर करण सक्‍सेना'साठी शूटिंग करताना सामना कराव्‍या...

ऋता दुर्गुळेने डिस्नी+ हॉटस्‍टारची सिरीज ‘कमांडर करण सक्‍सेना’साठी शूटिंग करताना सामना कराव्‍या लागलेल्‍या मोठ्या भितीबाबत सांगितले

 

जब कमांडर आता है तो भवंडर आता है! डिस्नी+ हॉटस्‍टारने नुकतेच सिरीज ‘कमांडर करण सक्‍सेना’चा अॅक्‍शनने भरलेला, रोमांचक ट्रेलर लाँच केला. या सिरीजमध्‍ये गुरमीत चौधरी, इक्‍बाल खान आणि ऋता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत आहेत. पुरूष प्रेक्षकांना लक्ष्‍य करणारी ही रोमांचक सिरीज नीडर आरएडब्‍ल्‍यू एजंटलच्‍या जीवनप्रवासाला सादर करते, जेथे तो देशाचे रक्षण करण्‍यासाठी उच्‍चस्‍तरीय राजकीय रहस्‍यामध्‍ये सामावून जातो. जतिन वागळे दिग्‍दर्शित आणि कीलाइट प्रोडक्‍शन्‍स निर्मित सिरीज ‘कमांडर करण सक्‍सेना’ प्रख्‍यात लेखक अमित खान यांनी रचलेल्‍या भूमिकेवर आधारित आहे. कमांडर करण सक्‍सेनाच्‍या लढाईत सामील व्‍हा, जेथे तो षडयंत्रामध्‍ये अडकून जातो, ज्‍यामध्‍ये प्रत्‍येक टप्‍प्‍यावर ट्विस्‍ट आहे. ही सिरीज रहस्‍य, भिती व विश्वासघाताला दर्शवते, जे तुम्‍हाला तुमच्‍या आसनांवर खिळवून ठेवतील. ही सिरीज आता फक्‍त डिस्नी+ हॉटस्‍टारच्‍या मोबाइल अॅपवर मोफतपणे पाहता येऊ शकते, तसेच नवीन एपिसोड्स सोमवार ते शुक्रवार पाहता येतील.

कलाकार म्‍हणून असुरक्षितता व फोबियावर मात करणे पडद्यावर सर्वोत्तम परफॉर्मन्‍स सादर करण्‍यासाठी आवश्‍यक आहे. ऋता दुर्गुळेने सिरीज ‘कमांडर करण सक्‍सेना’मधील तिच्‍या भूमिकेसाठी हीच गोष्‍ट केली. तिने प्रत्‍यक्ष भितीचा सामना केला आणि तिच्‍या मर्यादांना दूर करत भूमिकेमध्‍ये वास्‍तविकता व प्रबळता आणली.

याबाबत सविस्‍तरपणे सांगताना रचना म्‍हात्रेची भूमिका साकारणारी ऋता दुर्गुळे म्‍हणाली, मी आमच्‍या शोच्‍या मीटिंगसाठी गेले आणि त्‍यांनी मला बाइक चालवता येते का असे विचारले. मी सांगितले की सर्वकाही करू शकते, पण मला बाइक चालवणे शिकावे लागेल. १० ते १२ दिवसांनी मला पुष्‍टी मिळाली की मी सिरीजमध्‍ये रचना म्‍हात्रेची भूमिका साकारत आहे. ज्‍यानंतर मी एप्रिलमध्‍ये बाइक शिकण्‍याचे क्‍लासेस सुरू केले. यासाठी सहा सत्रे लागली, कारण माझ्या उंचीमुळे माझे पाय बाइकवर बसल्‍यानंतर जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्‍हते. पण, मी बाइक चालवण्‍याचे कौशल्‍य शिकले आणि त्‍यामध्‍ये निपुण झाले. ही माझ्या कौशल्‍यामधील अधिक भर आहे आणि मी बाइक चालवत राहणार आहे, कारण त्‍यामधून मिळणारा आनंद उत्‍साहवर्धक आहे. मी १८ वर्षांची असल्‍यापासून कार ड्राइव्‍ह करत आहे आणि त्‍याला १३ ते १४ वर्ष झाली आहेत. मी रिक्षा देखील चालवू शकते, तसेच रूग्‍णवाहिका देखील चालवू शकते, सर्वकाही ड्राइव्‍ह करू शकते. पण, बाइक चालवणे माझा मोठा फोबिया होता. असे असले तरी मी बाइक चालवायला शिकले आणि आम्‍ही शूटिंगसाठी वापरलेली बाइक खूप जड होती, ज्‍यामुळे मला खूप भिती वाटत होती. पण मला आनंद होत आहे की, मी सिरीज ‘कमांडर करण सक्‍सेना’साठी माझ्या भितीवर मात करत बाइक चालवू शकले.”

कमांडर करण सक्‍सेना यशस्‍वी होईल का? पहा सिरीज मोफत मोबाइलमधील डिस्नी+ हॉटस्‍टारवर, जेथे नवीन एपिसोड्स पहा सोमवार ते शुक्र

वार!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments