Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 'दगडूशेठ' गणपती ट्रस्टतर्फे आरोग्य शिबीर* *येरवडा, शांतीनगर, विश्रांतवाडी परिसरातील...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे आरोग्य शिबीर* *येरवडा, शांतीनगर, विश्रांतवाडी परिसरातील नागरिकांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजन*

 

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने पुणे शहरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर येरवडा, शांतीनगर, विश्रांतवाडी वसाहती मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या भागात पाणी शिरल्यामुळे ज्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेच्या शाळेतील शेल्टर होम्स येथे स्थलांतरीत केले तेथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधांचे वाटप करण्यात आले.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन आणि स्वर्गीय नानासाहेब पालकर स्मृती चिकित्सालय येरवडा पुणे व सूर्या सहयाद्री हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने नानासाहेब परुळेकर विद्यालय येरवडा पुणे येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

 

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बापू पठारे यांसह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. शहराच्या विविध भागात गरजेनुसार अशा प्रकारची आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येतील, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments