आज भारतीय जनता पार्टीने दिलेल्या संधीमुळे श्री अमित गोरखे यांनी विधान परिषदेचा सदस्य म्हणून शपथ घेतली, त्याप्रसंगी विधान परिषदेच्या अध्यक्ष सौ नीलिमाताई गोऱ्हे, नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य सौ पंकजाताई मुंडे, श्री सदाभाऊ खोत, श्री योगेश टिळेकर, श्री परिणय जी फुके , श्री मिलिंद जी नार्वेकर व इतर सदस्य उपस्थित होते.
शपथ घेताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व भारताच्या संविधानाला स्मरण करून नमन केले. तसेच महाराष्ट्राचे आमचे नेतृत्व श्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले .


