Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedअमनोरा पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन अजिंक्यपद रविवारपासून हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने...

अमनोरा पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन अजिंक्यपद रविवारपासून हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन

पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ७ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे. अशी माहिती संयोजन सचिव अभिजीत चांदगुडे आणि पीवायसी हिंदू जिमखान्याचे सचिव सारंग लागू यांनी दिली.

स्पर्धेचे यंदा १४ वे वर्षे आहे. या स्पर्धेला सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने पारितोषिके देण्यात येणार असून, कॉर्पोरेट अॅथलीट हे या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. तर योनेक्स सनराइज हे इक्विपमेंट प्रायोजक आहेत. स्पर्धेचे उद्घाटन पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचा ‘ड्रॉ’ ५ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे.

ही स्पर्धा ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील मुले-मुलींच्या एकेरी व दुहेरी गटात होणार आहे. त्यानंतर पुरुष, महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही मोठी स्पर्धा असणार आहे. ३५, ४०, ४५, ५०, ५५, ६० वर्षांवरील गटातही ही स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेसाठी एकूण ३ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ५० हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे. आजपर्यंत आयोजकांकडून १२ खेळाडूंना अशी स्कॉलरशिप देण्यात आली आहे, आणि सर्व स्कॉलरशिप मिळालेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments