Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedएसजीएल लॅब्सतर्फे हिरे आणि दागिन्यांबाबतच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन

एसजीएल लॅब्सतर्फे हिरे आणि दागिन्यांबाबतच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन

पुणे, ता. २९ः हिरे प्रमाणीकरण क्षेत्रातील प्रतिष्ठीत ब्रिटीश कंपनी एसजीएल लॅब्सच्या वतीने पुण्यात हिरे आणि दागिन्यांबाबतच्या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘डॅझल विथ डायमंड्स’ नावाचा हा १४ वा कार्यक्रम असून, या वार्षिक कार्यक्रमाचा उद्देश ८५ अब्ज डॉलरच्या रत्ने आणि दागिने उद्योगाचा आधारस्तंभ असलेल्या रिटेल विक्री संघांना शिक्षित करणे हे आहे.

 

 

 

‘डॅझल विथ डायमंड्स’ हा एक शैक्षणिक उपक्रम असून, जो उद्योगातील रिटेल विक्री संघांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखतो. रिटेल विक्री कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि कौशल्य यामुळे रत्न आणि दागिने उद्योग ८५ अब्ज डॉलरपर्यंत वाढला आहे. त्यांना सतत शिक्षित करणे आणि त्यांचे यश साजरे करणे महत्त्वाचे आहे, असे एसजीएल लॅब्सचे व्यवसाय विकास संचालक जिगर व्होरा यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

‘डॅझल विथ डायमंड्स’ या पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमातील सकाळच्या सत्राचे उद्घाटन पीएनजी ज्वेलर्सचे श्री. सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते झाले. या सत्रात पुण्यातील सर्व ज्वेलर्सच्या विक्री कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संध्याकाळी पुण्यातील प्रतिष्ठित ज्वेलर्सचा सहभाग असलेली दोन चर्चासत्रे झाली. या कार्यक्रमात फतेहचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या चर्चासत्रातील पहिले चर्चासत्र पुरुषांचे वर्चस्व असलेल्या रत्ने आणि आभूषण उद्योगात महिलांचे नेतृत्व या विषयावर होते. यात या उद्योगात संचालक पदावर कार्यरत असणाऱ्या प्रमुख महिलांच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला. त्यांचे योगदान आणि भावी पिढ्यांना मिळणारी प्रेरणा यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. दुसरे सत्र परिवर्तनाचे एक दशक: परंपरागत व्यवसाय ते जनरल झेड नवकल्पना या विषयावर झाले. यात मिलेनियल्स आणि जेन झी त्यांचे ज्ञान आणि सर्जनशीलतेने उद्योगात कशी क्रांती घडवून आणत आहेत, आधुनिक नवकल्पनांसह पारंपरिक पद्धतींचा मिलाफ घडवित आहेत, यावर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रात नेहा लागू (लागू बंधू मोतीवाले), शनिका राठोड (राठोड ज्वेलर्स), शीतल रांका (रांका ज्वेलर्स), जिगर व्होरा (एसजीएल लॅब्स), अनुप लुनानी (सॉलिटोरिया), वास्तुपाल रांका (रांका ज्वेलर्स) आणि तनय राठोड (राठोड ज्वेलर्स) यांच्या प्रमुखांचा समावेश होता.

 

 

 

या कार्यक्रमात जिगर व्होरा यांनी प्रमाणीकरणाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “उद्योग जसजसा विकसित होत जातो, तसतशी प्रमाणीकरणाची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण होत जाते. प्रमाणीकरणामुळे नैसर्गिक आणि प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या रत्नांची, दागिन्यांची सत्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित केली जाते. त्यामुळे ग्राहकांचा त्यांच्या खरेदीवरचा विश्वास वाढतो. एसजीएल लॅब्समध्ये आम्ही काळानुरुप होणाऱ्या बदलांशी जुळवून घेत आमची उत्कृष्टतेची आणि एकात्मतेची तत्त्वे कायम ठेवत उच्च दर्जाच्या प्रमाणीकरणासाठी वचनबद्ध

आहोत.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments