Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नगरच्या आठवणी’

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नगरच्या आठवणी’

१९६२ साली अण्णाभाऊ साठे ‘फकिरा’ चित्रपटाच्या शूटींगसाठी अहमदनगरला आले होते. नगरजवळील अकोळनेर गावात हे शूटींग होते. चित्रिकरणासाठी आलेल्या अभिनेत्यांची आणि तंत्रज्ञांची वेगवेगळ्या ठिकाणी सोय केली होती. वरील मंडळी भाई सम्या यांच्या बोर्डींगमध्ये होती. अभिनेते सूर्यकांत, नाना पळशीकर, डॉ. श्रीराम रानडे यांच्या निवासस्थानी तर डेव्हीड यांना यशोदा टॉकीज जवळील दौलत हॉटेलच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले होते. माझे मित्र लक्ष्मीनारायण रोहीवाल यांनी डेव्हीड यांची जबाबदारी पत्करली होती. त्यांना नेण्या-आणण्याचे, सोबत देण्याचे कार्य ते करीत हेते. डेव्हीड हे इंग्रज अधिकार्‍याची भूमिका करीत होते. माझे मित्र रोहिवालला हवालदाराचा ड्रेस घालून त्यांच्यासोबत ठेवले होते. गावच्या मातंग वस्तीत एका झोपडीत फकिराची लखलखती तलवार ठेवली होती. ग्रामपंचायत ऑफिसवरही शूटिंग होते. या चित्रपटात अण्णाभाऊ साठे स्वतः सावळ्यांची छोटी भूमिका करीत होते.

अण्णाभाऊ विडी पिण्याची तलफ असायची. चिरागनगरला (घाटकोपर) ते नेहमी विडीचा कट्टल मागवायचे. त्यांचे धाकटे बंधू शंकरराव ते आणून देत असत. नगरला असताना त्यांच्या विड्या संपल्या होत्या. त्यांनी आम्हाला ‘टुकडा बिडी’ आणण्यास सांगितले. आता त्यांची विडी कुठे मिळेल हा शोध लावत आले. लक्ष्मीनारायण रोहिवालच्या दुकानासमोर एक विडीचे दुकान होते. त्याच्याकडून त्यांनी त्यावेळची प्रसिध्दी कोंबडा छाप विडी, मिकुसायमासा क्षत्रीय यांची विडी, हरिभाई देसाई यांची विडी अशी बंडले आणून दिली. अण्णाभाऊंना तर त्यांचीच आवडती विडी हवी होती. शेवटी एक ‘लवंगी विडी’ मिळाली. ती त्यांना आवडली आणि त्यांनी ते बंडल ठेवून घेतले. तसेच नगरमध्ये मी बिडी कामगार युनियनचा कार्यकर्ता होतो. कॉ. राजाराम कुलथे आमचे नेते होते.

‘दासी पान सेंटर’ नगरचे प्रसिद्ध पानपट्टीचे दुकान होते. रात्री कलाकार मंडळीला घेऊन आम्ही त्यांना पान खाण्यास नेत असू. के. ए. अब्बास यांना नगरची प्रसिध्द मिठाई खायची होती. एके रात्री मी त्यांना चितळे रोडवरील वखारेच्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो. नगरचे जुने वाडे त्यांना फार आवडायचे.

एकदा डॉ. श्रीराम रानडे यांच्या घरी अण्णाभाऊ बसले असताना माझा मित्र जवाहर मुथा त्या ठिकाणी आला. अण्णाभाऊंनी त्याची विचारपूस केली. ‘जवाहर’ असे नाव सांगितल्यावर ‘अरे वा!’ जवाहरलाल मला फार आवडतात. म्हणून त्यांच्याशी गप्पा मारल्या. समोर श्रीराम रानडे यांच्याबरोबर हस्तांदोलन करणारे प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरूंचा फोटो होता. अण्णाभाऊनी मला ‘फकिरा’ कादंबरीची प्रत भेट दिली.

माझे चित्रकार मित्र नाथ वैराळ यांनी सर्जेपुरा येथील मातंग वस्तीत नेऊन नगरचा पहिला सत्कार केला. त्या सत्काराला माझे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे हिंदी शिक्षक स. म. घोरपडे आणि १२ नं. मराठी शाळेतील माझे वर्गशिक्षक पवार गुरुजी हे प्रमुख होते. आपल्या समान बांधवातर्फे झालेल्या या सत्काराचे अण्णाभाऊना फार समाधान वाटले.

प्रा. रतनलाल सोनग्रा

२०१, साराह एनक्लेव्ह, विमाननगर, पुणे – १४

मोबाईल ९८२२

३२८८२२

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments