Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाइस चेअरमन व सीईओ जेएच हॅन यांनी नोएडा फॅक्‍टरीला भेट दिली; सॅमसंगसाठी...

वाइस चेअरमन व सीईओ जेएच हॅन यांनी नोएडा फॅक्‍टरीला भेट दिली; सॅमसंगसाठी भारताच्‍या वाढत्‍या महत्त्वाचे संकेत दिले

जेएच हॅन यांचा या वर्षातील दुसरा भारत दौरा सॅमसंगचे देशासोबतचे संबंध अधिक दृढ करतो

 

नोएडा फॅक्‍टरी सॅमसंगची सर्वात मोठी सुविधा आहे, जी भारतातील व जगभरातील बाजारपेठांसाठी उत्‍पादन करते

 

गुरूग्राम, भारत – जुलै ३०, २०२४ – सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कं. लि. ने आज घोषणा केली की, सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या डिवाईस ईएक्‍सपेरिअन्‍स (डीएक्‍स) डिव्हिजनचे वाइस चेअरमन, सीईओ व प्रमुख जॉंग-ही (जेएच) हॅन सध्‍या या वर्षातील दुसऱ्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामधून दक्षिण कोरियन कंपनीसाठी देशाचे वाढते महत्त्व दिसून येते, ज्‍याअंतर्गत हॅन यांनी सोमवारी कंपनीच्‍या नोएडा फॅक्‍टरीला भेट दिली, जेथे सॅमसंग स्‍मार्टफोन्‍स, टॅब्‍लेट्स आणि रेफ्रिजरेटर्स उत्‍पादित करते.

 

”भारत जागतिक स्‍तरावर सर्वात मोठी व झपाट्याने विकसित होत असलेली बाजारपेठ आहे आणि सॅमसंगला मोठी संधी देते,” असे हॅन म्‍हणाले. ”आम्‍ही भारतात गुंतवणूक करणाऱ्या पहिल्‍या कंपन्‍यांपैकी एक होतो आणि मला आनंद होत आहे की, नोएडा फॅक्‍टरी आमची सर्वात मोठी सुविधा म्‍हणून उदयास आली आहे, जी भारतासह संपूर्ण विश्‍वासाठी उत्‍पादन करते.”

 

सॅमसंगने या वर्षाच्‍या सुरूवातीला त्‍यांच्‍या ‘एआय फॉर ऑल’ दृष्टिकोनाचे अनावरण केले, ज्‍याचा खुल्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स आणि हायपर-कनेक्‍टीव्‍हीटी सादर करत ग्राहकांचे जीवन सुधारण्‍याचा मनसुबा आहे.

 

या वर्षी, सॅमसंगचे गॅलॅक्‍सी एआय-पॉवर्ड प्रीमियम स्‍मार्टफोन्‍स आणि बीस्‍पोक एआय होम अप्‍लायन्‍सेस जसे रेफ्रिजरेटर्स, एसी व वॉशिंग मशिन्‍स यांनी एकत्रित अद्वितीय कनेक्‍टेड डिवाईसेस इकोसिस्‍टम तयार केली आहे, जी ग्राहकांना ऊर्जा बचत करण्‍यास सक्षम करण्‍यासोबत सोयीसुविधा, कनेक्‍टीव्‍हीटी आणि आरामदायीपणा देत आहे.

 

प्रगत तंत्रज्ञानाने संचालित या ‘वन सॅमसंग’ अनुभवाने कंपनीच्‍या उत्‍पादनांसाठी विविधता निर्माण करण्‍यास मदत केली आहे आणि प्रीमियम रेफ्रिजरेटर्स सारख्‍या विभागांमध्‍ये प्रबळ ग्राहक रूची निर्माण करत आहे. हे विभाग भारतात गेल्‍या काही वर्षांमध्‍ये झपाट्याने विकसित होत आहे, जेथे ग्राहक सुधारित वैशिष्‍ट्ये असलेल्‍या मोठ्या क्षमतेच्‍या रेफ्रिजरेटर्सना प्राधान्‍य देत आहेत. सॅमसंग अग्रस्‍थानी कायम असून बीस्‍पोक डिझाइन आणि एआय वैशिष्‍ट्यांसह बाजारपेठेत प्रीमियम उत्‍पादने सादर करत आहे.

 

हॅन यांनी भारतातील आरअँडडी टीम्‍सचे देखील नवीन उत्‍पादने व सेवांच्‍या विकासाप्रती देत असलेल्‍या योगदानांसाठी कौतुक केले.

 

”भारतात तंत्रज्ञानप्रेमी तरूण ग्राहकांची मोठी संख्‍या आहे, ज्‍यामधून आम्‍हाला नाविन्‍यता आणण्‍यास प्रेरणा मिळते,” असे हॅन म्‍हणाले. ”मला अभिमान वाटतो की, एआयच्‍या विकासामध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेले अधिकाधिक तरूण, उद्यमशील इंजीनिअर्स भारतातील आमच्‍या आरअँडडी केंद्रांमध्‍ये काम करत आहेत.”

 

सॅमसंग नोएडा आणि श्रीपेरंबुदुर येथील दोन अत्‍याधुनिक उत्‍पादन प्‍लांट्सच्‍या माध्‍यमातून ‘मेक इन इंडिया’प्रती समर्पित आहे, तसेच नोएडा येथील डिझाइन सेंटरमध्‍ये आणि तीन संशोधन व विकास (आरअँडडी) केंद्रांमध्‍ये गुंतवणूक देखील केली आहे. स्‍थानिक व जागतिक उत्‍पादनांसाठी नाविन्‍यतेला चालना देणाऱ्या तीन आरअँडडी केंद्रांपैकी दोन केंद्रे नोएडामध्‍ये आणि एक केंद्र बेंगळुरूमध्‍ये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments