Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाहीर हेमंतराजे मावळे यांची संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड

शाहीर हेमंतराजे मावळे यांची संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड

पुणे : संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शाहीर हेमंतराजे मावळे यांची निवड झाली आहे. द्वारकाधीश संस्थान, सोलापूर येथे संपन्न झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत सन २०२४ ते सन २०२७ या कालावधीसाठी मावळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

यावेळी अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजीत गोखले, सहक्षेत्रप्रमुख अजय देशपांडे, प्रांत महामंत्री सतीश कुलकर्णी, पालक अधिकारी दिलीप क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. सोलापूर समितीचे अध्यक्ष डॉ. इरेष स्वामी तसेच प्रांत कार्यकारिणी सदस्य व प्रांतभरातून आलेल्या सर्व समित्यांमधील कार्यकारणी सदस्यांची उपस्थिती होती.

 

पुढील तीन वर्षाच्या कार्यकाळासाठी कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली. १९८६ सालापासून संस्कार भारतीचे कार्य महाराष्ट्रात सुरु आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर, जितेंद्र अभिषेकी, चित्तरंजन कोल्हटकर, राजाभाऊ लवळेकर, चित्रकार कल्याण शेटे, गो. बं. देगलूरकर, राहुल सोलापूरकर, उस्तद उस्मान खाँ अशा दिग्गज कलावंतांना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. त्याच परंपरेत शाहीर मावळे या लोककलेतील साधकाची अध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे.

 

प्रांत महामंत्री म्हणून प्रशांत कुलकर्णी यांची निवड केली व नवनियुक्त महामंत्र्यांनी अध्यक्षांच्या अनुमतीने प्रांताची कार्यकारिणी घोषित केली. प्रांत उपाध्यक्षपदी ज्येष्ठ वेणु वादक पं. केशव गिंडे पुणे, अभिनेता योगेश सोमण पुणे, शिल्पकार संदीप लोंढे नाशिक, विचारवंत अभय भंडारी विटा, नृत्यांगणा सुवर्णाताई बाग पिंपरी चिंचवड यांची नियुक्ती करण्यात आली. सहमहामंत्री या पदावर विनायक माने पुणे व अमित मराठे सांगली तर कोष प्रमुख म्हणून अभय पटवर्धन पुणे, सहकोषप्रमुख ईशा वेलणकर पुणे मंत्री पदी मिलिंद भोळे व देवेश कासखेडीकर यांची नियुक्ती करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments