Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोनी इंडियाच्या ब्राव्हिया 8 OLED टेलिव्हिजन सीरिजसह घरीच आनंद घ्या सिनेमॅटिक अनुभूतीचा

सोनी इंडियाच्या ब्राव्हिया 8 OLED टेलिव्हिजन सीरिजसह घरीच आनंद घ्या सिनेमॅटिक अनुभूतीचा

नवी दिल्ली, १२ ऑगस्ट २०२४ – सोनी इंडियाने आज त्यांच्या घरगुती मनोरंजन उत्पादनांच्या श्रेणीत ब्राव्हिया 8 सीरिज या क्रांतिकारी उत्पादनाचा समावेश केल्याचे जाहीर केले. या नव्या सीरिजमध्ये अत्याधुनिक ओएलईडी तंत्रज्ञान आणि आधुनिक एआय प्रोसेसर एक्सआरसह समावेश करण्यात आला असून, त्यामुळे सर्वोत्तम दर्जाचे पिक्चर आणि ऑडिओचा आनंद घेता येतो. आधुनिक प्रेक्षकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या ब्राव्हिया 8 मध्ये योग्य ब्लॅक व शॅडो डिटेल्स डायनॅमिक कॉन्ट्रास्टसह समाविष्ट करण्यात आले आहे, तर अकॉस्टिक सरफेस ऑडिओ, तसेच डॉल्बी व्हिजन अटमॉस, तसेच आघाडीच्या स्ट्रिमिंग सेवांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले विविध स्टुडिओ कॅलिब्रेटेड मोड्स यात देण्यात आले आहेत.

 

 

 

ब्राव्हिया 8 सीरिजमध्ये देण्यात आलेले स्टुडिओ कॅलिब्रेटेड मोड्स फिल्म कंटेंट क्रिएटर्सना अपेक्षित असलेल्या इमेजच्या दर्जातच घरी पाहायला मिळतात. सध्या प्रस्थापित असलेले नेटफ्लिक्स अडॅप्टिव्ह कॅलिब्रेटेड मोड आणि सोनी पिक्चर्स कोअर (पूर्वीचे ब्राव्हिया कोअर), कॅलिब्रेटेड मोड, प्राइम व्हिडीओ कॅलिब्रेटेड मोड हे नवीन मोड्स ग्राहकांना क्रिएटरच्या दृष्टिकोनातून अपेक्षित असलेले उच्च दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करून देतात.

 

 

 

नवी ब्राव्हिया 8 सीरिज १६४ सेमी (६५) आणि १३९ सेमी (५५) स्क्रीन आकारात उपलब्ध केली जाईल. ब्राव्हिया 8 सीरिजमधील आधुनिक एआय प्रोसेसर एक्सआरमध्ये दृश्य आणि ध्वनीचा मानवी दृष्टिकोन समजण्याची क्षमता आहे. मानवी विश्वाप्रमाणे डेटाचे विश्लेषण आणि प्रक्रिया करून अधिक नैसर्गित व जिवंत इमेजेस, तसेच ध्वनी तयार केला जातो. ब्राव्हिया 8 सीरिजमधील ओएलईडी तंत्रज्ञान असामान्य दर्जाचे पिक्चर, अचूक ब्लॅक आणि शॅडो डिटेल्स व दर्जेदार कॉन्ट्रास्ट देते. ब्राव्हिया 8 सीरिजमध्ये एक्सआर फोरके अपस्केलिंग तंत्रज्ञान कॉग्निटिव्ह प्रोसेसर एक्सआरद्वारे उपलब्ध करण्यात आले आहे. हा टीव्ही २के सिग्नल्स खऱ्या ४के दर्जापर्यंत नेऊन अधिकाधिक जिवंत, तपशीलवार आणि इमर्सिव्ह चित्र पाहण्याचा अनुभव देतो. त्याला एक्सआर ओएलईडी मोशन तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून, त्यामुळे वेगवान सीन्सही सफाईदार आणि ठळक दिसतात.

 

 

 

ब्राव्हिया 8 सीरिज डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अटमॉससारख्या आधुनिक ऑडिओ व व्हिज्युल तंत्रज्ञानाला पूरक आहे. डॉल्बी व्हिजनमुळे उठावदार व्हिज्युअल्स असामान्य कॉन्ट्रास्टसह देते, तर डॉल्बी अटमॉस बहुआयामी ध्वनी देत असल्यामुळे तुम्हाला त्या घटनेचा भाग असल्यासारखे वाटते.

 

 

 

ब्राव्हिया 8 सीरिजमध्ये सोनी पिक्चर्स कोअर हा अनोखा प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे, ज्यात सोनी पिक्चर्सच्या सिनेमांचा संग्रह समाविष्ट करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये ४के एचडीआर आणि आयमॅक्स एनहान्स्ड सिनेमेही देण्यात आले असून, दर्जेदार पिक्चर आणि ध्वनीमुळे सिनेमे पाहण्याचा आनंद द्विगुणित होतो. २४ महिन्यांसाठी १० सिनेमे ४के ब्लू- रे दर्जा आणि आयमॅक्ससह क्रेडिट करता येणार आहेत. उच्च दर्जाच्या व्हिज्युअल्समुळे घरगुती मनोरंजनाचा अनुभव उंचावतो आणि मोठ्या पडद्याचा आनंद घरीच घेता येतो.

 

 

 

ब्राव्हिया 8 सीरिज गेमिंगसाठी योग्य असून, प्लेस्टेशन ५ साठी परफेक्ट आहे. ऑटो एचडीआर टोन मॅपिंगचा त्यात समावेश करण्यात आला, जे आपोआप एचडीआर सेटिंग्ज सर्वोत्तम पिक्चर क्वालिटीप्रमाणे बदल करते. व्हेरिएबल रिफ्रेश रेट (व्हीआरआर) आणि ऑटो लो लेटन्सी मोडमुळे (एएलएलएम) प्रतिसादात्मक गेमप्लेसाठी सफाईदार व स्पष्ट हालचाली मिळतात. ब्राव्हिया 8 सीरिजमध्ये गुगल टीव्हीच्या सहकार्याने स्मार्ट युजर एक्सपीरियन्स, ४००,००० सिनेमे व टीव्ही एपिसोड्स, १०,००० पेक्षा जास्त ॲप्स आणि गेम्स उपलब्ध होतात. गुगल टीव्हीतर्फे तुमचा सर्व आवडीचा कंटेंट एकाच ठिकाणी पाहायला मिळत असल्यामुळे तो शोधून पाहाणं सोपं होतं. व्हॉइस सर्च सुविधेमुळे हँड्स फ्री कंट्रोल वापरता येतात आणि ॲपल एयरप्ले२ व होमकिट समाविष्ट केल्यामुळे सर्व ॲपल उपकरणे सहजपणे कनेक्ट करता येतात.

 

 

 

किंमत आणि उपलब्धता

 

मॉडेल

 

सर्वोत्तम किंमत (रुपये)

 

उपलब्धतेची तारीख

 

K-65XR80

 

314,990/-

 

Available now

 

K-55XR80

 

219,990/-

 

Available now

 

 

 

ही मॉडेल्स सोनीच्या सर्व सेंटर्सवर, प्रमुख इलेक्ट्रॉनिक दालने, भारतातील ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. सोनीद्वारे ब्राव्हिया 8 सीरिजवर दोन वर्षांची वॉरंटीही दिली जात आहे.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments