Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedघरोघरी तिरंगा अभियान.. पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे जोमाने

घरोघरी तिरंगा अभियान.. पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे जोमाने

पिंपरी, दि. १३ ऑगस्ट २०२४- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना आणि राष्ट्रध्वजाबद्दल जनजागृती करण्यासाठी यावर्षीही राज्य शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमातंर्गत घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी शहरवासीयांना केले आहे. तसेच या उपक्रमासाठी नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये नाममात्र शुल्कामध्ये ध्वज उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 

याव्यतिरिक्त, ‘’घरोघरी तिरंगा’’ मोहीम राबवण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानी दिलेल्या सूचनांचे पालन करून विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी तात्काळ नियोजन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा असे विविध कार्यक्रम महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments