Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorized78 व्या भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ध्वजारोहण संपन्न होणार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या...

78 व्या भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ध्वजारोहण संपन्न होणार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते*

 

 

*ठाणे, दि.13(जिमाका) :-* 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवार, दि.15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 09.05 वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

या राष्ट्रध्वज वंदन समारंभास शासकीय अधिकारी/कर्मचारी व नागरिकांनी राष्ट्रीय अथवा समारंभीय पोषाखात समारंभ सुरु होण्याच्या 20 मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी केले आहे.

यानिमित्त शासकीय ध्वजारोहण हे जिल्हा, उपविभागीय, तालुका तसेच ग्रामपंचायत पातळीवर करण्यात यावे,असे निर्देश शासनाने दिले आहेत.

ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ हा सर्व ठिकाणी एकाच वेळी म्हणजे सकाळी 9 वा. 05 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे सकाळी 8 वाजून 35 मि. ते सकाळी 9 वा. 35 मि. या कालावधीत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय कार्यक्रम आयोजित करु नये. जर एखाद्या संस्थेला वा कार्यालयाला ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल तर तो त्यांनी सकाळी 8 वा.35 मि. पूर्वी किंवा सकाळी 9 वा. 35 मि. या वेळेनंतर आयोजित करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

00000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments