Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे, महाराष्ट्र येथील ‘यूनाइट’ची सॅमसंग ‘सॉल्व्ह फॉर टूमॉरो’साठी निवड; उपान्त्य फेरीतील टॉप...

पुणे, महाराष्ट्र येथील ‘यूनाइट’ची सॅमसंग ‘सॉल्व्ह फॉर टूमॉरो’साठी निवड; उपान्त्य फेरीतील टॉप २० मध्ये प्रवेश

गुरुग्राम, २९ जुलै २०२४: सॅमसंग इंडियाने आज ‘सॉल्व्ह फॉर टूमॉरो’ २०२४ या आपल्या प्रमुख सीएसआर कार्यक्रमाच्या राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीसाठीच्या सर्वोतृष्ट २० टीम्सची घोषणा केली. यानंतर होणाऱ्या राष्ट्रीय फेरीमध्ये प्रवेश करण्यास सज्ज असलेल्या या टीम्स देशाच्या भव्य भौगोलिक विविधतेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आहेत, ज्यांमध्ये भारतातील १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील स्पर्धकांचा समावेश आहे. यातील काही सहभागी मणिपूरमधील इम्फाळ, मेघालयातील पूर्व खासी हिल्स आणि छत्तीसगढमधील बिलासपूर अशा काही अत्यंत दूरस्थ ठिकाणांमध्ये राहणारे आहेत.

 

या कार्यक्रमाच्या या तिसऱ्या पर्वामध्ये विद्यार्थ्यांनी ‘समाज व समावेशकता’ आणि ‘पर्यावरण व शाश्वतता’ या दोन व्यापक आवाका असलेल्या विषयसूत्रांअंतर्गत आपल्या कल्पना सादर केल्या. शालेय श्रेणी अर्थात स्कूल ट्रॅकमधून आलेल्या सुमारे २० टक्‍के कल्पना या शिक्षण आणि वंचित समुदायांना संसाधने उपलब्ध करून देण्याशी संबंधित समस्या तसेच अनुभवात्मक शिक्षण व डिजिटल साक्षरतेशी निगडित आव्हानांवर लक्ष्य केंद्रित करणाऱ्या आहेत. युवक श्रेणी अर्थात युथ ट्रॅकमधून आलेल्या सुमारे २५ टक्‍के कल्पना जलसंवर्धन, आर्सेनिक प्रदूषण, पाण्याचा अपव्यय आणि नदीखोऱ्यांभोवती निर्माण होत असलेला पर्यावरणीय असमतोल या विषयांभोवती केंद्रित आहेत. याखेरीज जवळ-जवळ ४० टक्‍के कल्पना ट्रॅफिकमुळे होणाऱ्या वायूप्रदूषणाला आळा घालणे, कचरा व्यवस्थापनाच्या पद्धतींचा अभाव आणि एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकमधील वाढ तसेच वणवा यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या आहेत.

 

“सॉल्व्ह फॉर टूमॉरो या सॅमसंगच्या प्रमुख सीएसआर कार्यक्रमाने यावर्षी शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे प्रत्यक्ष जगातील आव्हानांना सोडविण्यासाठी सक्षम करण्यावर भर दिला आहे. यावर्षी आम्ही देशाच्या दूरस्थ कानाकोपऱ्यांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले आहे आणि भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या भागांचे प्रतिनिधीत्व करणारे विद्यार्थी या उपक्रमात सामील येण्यासाठी पुढे येत आहेत, ही आमचा उत्साह वाढविणारी गोष्ट आहे. आमच्या ऑफिसेस आणि आरअँडडी सेंटर्समधील इनोव्हेशन वॉक्ससाठी आणि अंतिमत: आयआयटी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पातळीवर आपली कल्पना मांडण्यासाठी निवडल्या गेलेल्या टीम्सना आमच्या शुभेच्छा.”सॅमसंगचे नैऋत्य आशिया प्रांताचे कॉर्पोरेट व्हाइस प्रेसिडंट एसपी चन म्हणाले.

 

“त्यांच्या कल्पना कशाप्रकारे आकारास येत आहेत आणि सूक्ष्म स्तरावरील सामाजिक समस्यांना त्या कशाप्रकारे सोडवत आहेत, हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.” ते पुढे म्हणाले.

 

“सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमॉरोबरोबर आपली भागीदारी चालू ठेवत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाची रूपरेखा ही स्थानिक ठिकाणच्या प्रतिभेला सहभागी करून घेण्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे, जे चाळणीनंतर निवडल्या गेलेल्या कल्पनांमध्ये प्रतिबिंबित झाले आहे. काही कल्पना या खरोखरीच प्रेरणादायी आणि आश्वासक आहेत. देशाच्या स्टार्ट-अप परिसंस्थेला बळ देण्याची क्षमता असलेल्या स्थानिक प्रतिभेच्या वाटचालीचे साक्षीदार बनण्यास आम्ही उत्सुक आहोत.” प्रा. प्रीती रंजन पांडा, एमडी एफआयटीटी, आयआयटी-दिल्ली म्हणाल्या.

 

या राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या २० टीम्सना सॅमसंग इंडियाच्या कार्यालयांमध्ये आणि आरअँडडी सेंटर्स तसेच डिझाइन सेंटर्समधील इनोव्हेशन वॉकला हजेरी लावण्याची आगळीवेगळी संधी मिळणार आहे. हा इनोव्हेशन वॉक पूर्ण झाला की या २० टीम्स राष्ट्रीय स्तरावर आपली कल्पना मांडण्याची संधी देणाऱ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतील, जिथे त्या आपापल्या ट्रॅक्स किंवा श्रेणींमध्ये स्पर्धा करतील व सॅमसंगचे तज्ज्ञ व नेतृत्वफळीतील अधिकारी यांचा समावेश असलेल्या राष्ट्रस्तरीय परीक्षक मंडळासमोर आपल्या कल्पना मांडतील.

 

उपान्त्य फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांना काय मिळणार:

 

स्कूल ट्रॅक: उपान्त्य फेरीत पोहोचलेल्या १० टीम्सना प्रारूप विकसित करण्यासाठी २०,००० रुपयांचे अनुदान व सॅमसंग गॅलेक्सी टॅब्ज दिले जातील. अंतिम फेरीत पोहोचलेल्या ५ टीम्सना प्रारूपात सुधारणा करण्यासाठी प्रत्येक १ लाख रुपयांचे अनुदान व सॅमसंग गॅलेक्सी घड्याळे दिली जातील.

 

युथ ट्रॅक: उपान्त्य फेरीत पोहोचलेल्या १० टीम्सना प्रारूप विकासासाठी २०,००० रुपयांचे अनुदान व सॅमसंग गॅलेक्सी लॅपटॉप्स दिले जातील. अंतिम फेरीत पोहोचलेल्या ५ टीम्सना प्रारूपात सुधारणा करण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान व सॅमसंग झेड फ्लिप स्मार्टफोन्स दिले जातील.

 

विजेत्यांना काय मिळणार:

 

स्कूल ट्रॅक: विजेत्या टीमला सॉल्व्ह फॉर टूमॉरो २०२४ चे “कम्युनिटी चॅम्पियन” म्हणून घोषित केले जाईल व त्यांना प्रारूप सुधारणेसाठी २५ लाख रुपयांचे बीज अनुदान मिळेल. विजेत्या टीम्सच्या शाळांनाही शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सॅमसंगची उत्पादने दिली जातील, ज्यातून समस्यांची उकल शोधण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन मिळू शकेल.

 

युथ ट्रॅक: विजेत्या टीमला सॉल्व्ह फॉर टूमॉरो २०२४ चे ‘एन्व्हायर्नमेंट चॅम्पियन’ म्हणून घोषित केले जाईल व त्यांना आयआयटी दिल्ली येथे इन्क्युबेशनसाठी ५० लाख रुपयांचे अनुदान मिळेल. विजेत्या टीम्सच्या कॉलेजांनाही शैक्षणिक सुविधांना बळ देण्यासाठी सॅमसंग उत्पादने दिली जातील, ज्यातून सामाजिक उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल.

 

पहिल्यांदा २०१० साली यूएसमध्ये सुरू झालेला सॉल्व्ह फॉर टूमॉरो हा उपक्रम सध्या जगभरातील ६३ देशांमध्ये कार्यरत आहे व जगभरातील २३ लाख युवकांनी यात भाग घेतला आहे.

 

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे ‘टूगेदर फॉर टूमॉरो! एनेबलिंग पीपल’ हे सामाजिक बांधिलकी अर्थात सीएसआर उपक्रमांसाठीचे वैश्विक ध्येयधोरण जगभरातील युवा व्यक्तींना शिक्षण पुरविण्याप्रती व त्यातून उद्याचे नेतृत्व सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या सीएसआर प्रयत्नांविषयीच्या अधिक कहाण्या आमचे सीएसआर वेबपेज http://csr.samsung.com येथे वाचता येतील.

 

SNI: Samsung ‘Solve for Tomorrow’ Announces the National Shortlis

t of 20 Semi-Finalist Team

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments