Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedआय-स्पोर्ट मेडिकल सेंटर’चे पुण्यात उद्घाटन: स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक आणि स्पोर्ट्स मेडिसिनमधील नवे युग...

आय-स्पोर्ट मेडिकल सेंटर’चे पुण्यात उद्घाटन: स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक आणि स्पोर्ट्स मेडिसिनमधील नवे युग हे

पुणे, 16 ऑगस्ट 2024: ऑर्थोपेडिक स्पोर्ट्स सर्जरी आणि मेडिसिनला समर्पित आय-स्पोर्ट मेडिकल सेंटर या स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक आणि स्पोर्ट्स मेडिसिनमधील अद्ययावत संकल्पना आणि सुविधा असलेल्या बालेवाडी येथील या सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार, यांच्या हस्ते झाले. हे अत्याधुनिक वैद्यकीय केंद्र स्पोर्ट्स दरम्यान होणाऱ्या दुखापतींना प्रतिबंध, व्यवस्थापन आणि दुखापतीतून बरे होण्यातील एक नवी परिभाषा प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे.

 

आय-स्पोर्ट मेडिकल सेंटर हे या प्रदेशातील पहिले केंद्र आहे, जे क्रीडापटू आणि धावपळीची जीवनशैली असलेल्या व्यक्तींच्या गरजेनुसार सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान करते. जागतिक दर्जाचे स्पोर्ट्स मेडिसिन सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे सेंटर उभारण्यात आले असून, तज्ज्ञ डॉक्टर आणि बायो-मेकॅनिक्स शास्त्रज्ञ येथे सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. हे सेंटर पुराव्यावर आधारित उपचार आणि वैयक्तिक काळजी देण्यासाठी निर्माण केले असून, प्रत्येक रुग्णाला उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळेल, याची ते हमी देते.

 

आय-स्पोर्ट मेडिकल सेंटरचे संचालक डॉ. सुमेध मगर यांनी उद्घाटनावेळी या सुविधेबद्दलचे त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट करताना सांगितले की, “आय-स्पोर्ट मेडिकल सेंटरमध्ये, आम्ही सर्वांसाठी आधुनिक ऑर्थोपेडिक आरोग्याचा ३५ वर्षांचा वारसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहोत. ऑर्थोपेडिक सर्जन, फिजिओथेरपिस्ट, बायो-मेकॅनिस्ट आणि मानवी कार्यक्षमता शास्त्रज्ञांचा येथे समावेश असून, एक अनोखी शिस्तबद्ध पद्धती आम्ही विकसित केली आहे. आमचे उच्च दर्जाची देखभाल प्रदान करण्याचे ध्येय रुग्णांना पुन्हा त्यांची सर्वोत्तम शारीरिक क्षमता परत मिळवण्यासाठी सक्षम करते. आम्ही वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवीनतम प्रगती आणि रुग्ण-केंद्रित देखभालीवर लक्ष केंद्रित करून आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सर्वोत्तम उपचार मिळतील याची खात्री देतो.”

 

डॉ. सुमेध मगर, एक कुशल ऑर्थोपेडिक सर्जन आणि स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ असून त्यांनी ब्रिटनमध्ये( यूके) प्रशिक्षण घेतले आहे आणि त्यांचे अत्याधुनिक ज्ञान आणि कौशल्याचा अनुभवी खजिना येथे प्रदान करतात. ऑर्थोपेडिक सर्जरी आणि स्पोर्ट्स मेडिसिनमधील मास्टर्ससह त्यांची अनोखी शैक्षणिक पार्श्वभूमी या क्षेत्रात प्रगती करण्यासाठीचे त्यांचे समर्पण अधोरेखित करते. ॲडल्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरीमध्ये

 

फेलोशिपसह, डॉ. मगर यांचे आर्थ्रोस्कोपी, जॉइंट प्रिझर्वेशन सर्जरी आणि आर्थ्रोप्लास्टी या विषयातील प्राविण्य या बळावर ते या क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव बनले आहेत. फिफा मेडिकल सेंटर आणि लंडनमधील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मान्यताप्राप्त संस्थांमधील त्याच्या बहुआयामी अनुभवातून आय-स्पोर्ट मेडिकल सेंटरची कल्पना रुजली आहे.

 

आय-स्पोर्ट मेडिकल सेंटर ही केवळ वैद्यकीय सुविधा नाही; तर ते शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. परवडणारी, जागतिक दर्जाची सुविधा प्रदान करून, महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधीलदेखील क्रीडापटूंचे आयुष्य उत्तम करण्यासाठी संशोधनावर आधारित दृष्टिकोन विकसित करण्याचे त्यांचे ध्येय आहे. येथील रुग्णांच्या यशस्वी कथा त्याच्या विशेष दृष्टिकोनाच्या परिणामकारकतेचा आणि वैद्यकीय तुकडीच्या समर्पणाचा पुरावा आहे.

 

आय-स्पोर्ट मेडिकल सेंटर बद्दल:

 

आय-स्पोर्ट मेडिकल सेंटर हे स्पोर्ट्स मेडिसिनच्या तत्त्वज्ञानावर आधारित क्रिडाक्षेत्राला समर्पित पहिले हॉस्पिटल आहे, जे ऑर्थोपेडिक्स आणि स्पोर्ट्स मेडिसिनचे सर्व कौशल्य एका ठिकाणी उपलब्ध करते. सांधे आणि अस्थिबंधाच्या दुखापतींसाठी प्रगत आर्थ्रोस्कोपी, क्रीडा आणि सर्वसाधारण ऑर्थोपेडिक दुखापतींतून पुनर्वसन, बायोमेकॅनिकल मूल्यांकन आणि कार्यक्षमतेचे विश्लेषण अशा सर्व सुविधा येथे एकाच छताखाली आहेत. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, रिकव्हरी रूम्स, रिहॅब जिम, हाय एंड व्हिडीओ ॲनालिसिस सिस्टीमसह स्पोर्ट्स लॅब, स्ट्रेंथ ॲसेसमेंट सिस्टीम आणि व्यायामाची सुविधा अशा सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments