Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्हर्टिव्हतर्फे पुण्यातील चाकण परिसरात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन संप्पन्न

व्हर्टिव्हतर्फे पुण्यातील चाकण परिसरात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन संप्पन्न

पुणे ९ जानेवारी २०२४ : जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि निरंतरता उपाय प्रदान करणाऱ्या व्हर्टिव्हतर्फे डेटा सेंटर्स आणि साहाय्यक इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुण्यातील चाकण येथे आपल्या नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले. अंबरनाथ आणि पुणे येथील व्हर्टिव्हच्या वर्तमान उत्पादन सुविधांना पूरक असा हा नवीन प्लांट डेटा सेंटर्स, टेलिकॉम, व्यावसायिक आणि औद्योगिक अँप्लिकेशन्स यांच्यासाठी अनुरूप अशी थर्मल मॅनेजमेंट प्रॉडक्ट्स बनवतो आणि देशातील आणि विदेशातील बाजारपेठांना पुरवठा करतो.
२१०००० चौरस फुट / १९५१० चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळात पसरलेली ही सुविधा २०० डब्ल्यू ते २ एमडब्ल्यू + दरम्यानच्या कूलिंग सोल्यूशन्सच्या निर्मितीत मदत करते. यामध्ये एडिअबॅटिक फ्री कूलिंग चिलर्स, मोठी कस्टम एअर हॅंडलिंग यूनिट, थर्मल वॉल युनिट्स, मोठ्या डायरेक्ट एक्सपान्शनची नवी श्रेणी, पॅकेज केलेले डीएक्स आणि ऊर्जा-सक्षम युनिट्स सहित फ्री कूलिंग, इन-रो कूलिंग युनिट्सची नवी श्रेणी, वॉल माऊंट युनिट्स आणि रॅक कूलिंग सिस्टमचा समावेश आहे. या सुविधेत अत्याधुनिक परफॉर्मन्स परीक्षण, समर्पित ग्राहक अनुभव सेंटर आणि डिझाईन सपोर्ट क्षमता प्रदान करण्यासाठी सायकोमेट्रिक लॅब आहेत. ही सुविधा इंडिया ग्रीन बिल्डिंग काऊंसिलला अनुरूप असलेल्या पार्कमध्ये स्थित आहे, जे स्थिरता आणि पर्यावरणावर प्रभाव कमी करण्यावर फोकस करते.
या नवीन सुविधेबद्दल बोलताना व्हर्टिव्हचे कार्यकारी अधिकारी जिओर्डानो (जिओ) अल्बर्टाझी म्हणाले की ,“जागतिक डिजिटायझेशनचे वाढते प्रमाण आणि आर्टिफिश्यल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला अंगीकार यामुळे डेटा सेंटर उद्योगात झपाट्याने वाढ होत आहे तसेच डेटा सेंटर थर्मल आणि पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरसह इतर कारणांसाठी अधिक क्षमतेची मागणी होत आहे. आम्ही आमची तिसरी उत्पादन सुविधा भारतात उभारत असल्यामागचे मुख्य कारण हे आहे की, भारत एपीएसी प्रांतात डेटा सेंटर हब म्हणून नावारूपाला आला आहे. शिवाय, जागतिक मागणी पूर्ण करण्याबरोबरच ही सुविधा या देशातील डेटा सेंटर ईकोसिस्टम पोसण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते.”

व्हर्टिव्ह इंडियाचे मॅनिजिंग डायरेक्टर शुभाशीष मजुमदार म्हणाले की , “भारतातील डेटा सेंटर उद्योगात देशी आणि विदेशी कंपन्यांमधून लक्षणीय गुंतवणूक करण्यात येत आहे. अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर असलेला आमचा नवीन प्लांट आम्हाला अधिक थर्मल व्यवस्थापन क्षमता प्रदान करण्यास, लीड टाइम सुधारण्यात आणि अत्यंत अनुरूप, मोठी आणि जटिल सोल्यूशन्स प्रदान करण्याची आमची क्षमता वाढवण्यास मदत करेल. ग्लोबल ऑफरिंगव्यतिरिक्त व्हर्टिव्ह भारतातील अनोखे पर्यावरण आणि देशातील इन्फ्रास्ट्रक्चरच्या आवश्यकता यांना अनुरूप सोल्यूशन्स देईल, ज्यामुळे इष्टतम कामगिरी आणि विश्वसनीयता साध्य होईल. ही नवीन सुविधा व्हर्टिव्हला मेक इन इंडिया उपक्रमास साहाय्य चालू ठेवण्यास मदत करेल.”

एका जेएलएल रिपोर्ट अनुसार, भारतातील डेटा सेंटर उद्योग आगामी तीन वर्षात तब्बल ६७८ एमडब्ल्यू प्रसारासाठी सज्ज आहे आणि २०२५ पर्यंत त्याची क्षमता १४०० एमडब्ल्यू पोहोचणार आहे. यामुळे, भारत जगातील १३व्या क्रमांकाचे सर्वात मोठे मार्केट बनेल. शिवाय, इंडिया ब्रीफिंगच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत ४५ नवीन डेटा सेंटर्स विकसित होऊ घातली आहेत, ज्यांचे एकत्रित क्षेत्रफळ १३ मिलियन चौरस फुट आणि क्षमता १०१५ एमडब्ल्यू असेल आणि त्यांच्यामुळे हा व्यवसाय २०२७ पर्यंत $९.२७ वर पोहोचेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments