Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedसौंदर्यशास्त्र ही आजच्या काळाची गरज - डॉ.मधु चोप्रा

सौंदर्यशास्त्र ही आजच्या काळाची गरज – डॉ.मधु चोप्रा

पुणे 2 सप्टेंबर २०२४ : आजच्या काळात प्रत्येक जण विविध क्षेत्रात काम करत असताना लोकांना चांगले दिसणे खूप महत्त्वाचे वाटू लागले आहे. सौंदर्यशास्त्राकडे (कॉस्मेटोलॉजी) पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची वेळ आली आहे. म्हणूनच वास्तविक किंवा जाणवत असलेल्या दिसण्याबद्दलच्या त्रुटींसाठी मदत घेण्याकडे गरज म्हणून पाहिले पाहिजे,असे मत प्रख्यात कॉस्मेटोलॉजिस्ट व स्टुडिओ एस्थेटिक्सच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ.मधु चोप्रा यांनी व्यक्त केले. इंटरनॅशनल स्कुल ऑफ क्लिनिकल एस्थेटिक्स (आयएससीए) तर्फे आयोजित ग्लोबल एस्थेटिक्स समिट 2024 या परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी आयएससीए व कॉस्मो स्क्वेअरच्या संस्थापिका आणि प्रसिध्द सौंदर्य चिकित्सक व ट्रायकोलॉजिस्ट डॉ.तृष्णा गुप्ते यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

 

डॉ.चोप्रा म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्ती ही खास आहे आणि प्रत्येकाने आपले रूप स्विकारावे व हे आपल्या यशाच्या मार्गात येता कामा नये. जर एखाद्याला सौंदर्यशास्त्राची आवश्यकता असेल तर सर्व प्रक्रियांकडे या इतर कोणत्याही आरोग्य क्षेत्रातील सेवेप्रमाणेच पाहणे गरजेचे आहे.

 

आयोजन अध्यक्षा डॉ.तृष्णा गुप्ते म्हणाल्या की, दोन दिवसीय परिषदेत लेझर ॲडव्हान्सेस,हायपरपिग्मेंटेशन,बॉडी कॉन्टूरिंग, चेहऱ्यावरील डाग दुरूस्त करणे यासारख्या विषयांवरील सत्रांबरोबरच प्रात्यक्षिके आणि प्रबंध सादरीकरण यांचा समावेश होता.

 

घरगुती उपचार आणि सर्वांगीण देखभाल याबाबत बोलताना डॉ.चोप्रा म्हणाल्या की, कॉस्मेटोलॉजिस्टच्या दृष्टीकोनातून पाहिले तर सौंदर्य हे त्वचेपेक्षा अधिक खोल असते. पृष्ठभागावर बदल केले जाऊ शकतात परंतु या प्रयत्नांचा प्रभाव याच्याही पलीकडे जाऊन रुग्णांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत करते. मुख्य म्हणजे यशासाठी सकारात्मक विचारांची आवश्यकता असते. तसेच मन,शरीर आणि अध्यात्म यासह सर्वांगीण आरोग्य खूप महत्त्वाचे आहे असे मला वाटते. ध्यानधारणा,आत्मनिरीक्षण हे आंतरिक उपाय असून यामुळे तुमचे बाह्य सौंदर्य खुलून येते.

 

सौंदर्यशास्त्र चिकित्सकांना सल्ला देताना त्या म्हणाल्या की, चिकित्सा करताना समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. सौंदर्यशास्त्र क्षेत्र जलद गतीने प्रगती करत असून यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अशा प्रकारच्या परिषदांमुळे आम्हाला आधुनिक आणि नवीनतम संकल्पनांबाबत जागरूक राहण्यास मदत

होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments