Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedकँडललाइट कॉन्सर्टने पुणे उजळले

कँडललाइट कॉन्सर्टने पुणे उजळले

पुणे, भारत, 30 ऑगस्ट 2024: जागतिक स्तरावर नावाजलेल्या कँडललाइट कॉन्सर्टने मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद येथील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्यानंतर पहिल्यांदाच मेणबत्त्यांच्या सौम्य आणि प्रसन्न वातावरणात पियानोवरील लाइव्ह म्युझिक सादर करत पुण्यात नेत्रदीपक पदार्पण केले. या संगीत मालिकेतील पहिला कार्यक्रम 30 ऑगस्ट रोजी रॅडिसन ब्लू हॉटेल, पुणे खराडी येथे “सर्वोत्कृष्ट चित्रपट साउंडट्रॅक” सादरीकरणासह पार पडला. यावेळी पुणेकरांनी मेणबत्त्यांच्या शांतवार प्रकाशात सुरांमध्ये न्हाहून जाण्याचा अनुभव घेतला.

 

लिव्ह युवर सिटी इंडियाच्या कंट्री मॅनेजर दीपा बजाज यांनी पुण्यातील विस्ताराबाबत उत्साह व्यक्त केला. “येथे कँडललाइट कॉन्सर्टला रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्हाला आनंद झाला आहे. स्थानिक समुदायाला अत्यंत वेगळे आणि असाधारण अनुभव देणे हेच आमचे ध्येय असून यासाठी आम्हाला स्थानिक प्रतिभावान कलाकारांची मदत घ्यायची आहे. तसेच विशिष्ट ठिकाणे निवडून, शास्त्रीय आणि कालातीत संगीत प्रत्येकापर्यन्त पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे. येत्या काही महिन्यांत राज्यातील अधिक शहरांमध्ये असा कॅन्डललाइट अनुभव देण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

 

या कार्यक्रमाच्या यशस्वी सुरुवातीनंतर, 27 आणि 28 सप्टेंबर रोजी कोल्डप्लेची सर्वोत्कृष्ट हिट गाणी पियानोच्या साहाय्याने वाजवून पुणेकरांना अजून एक मेजवानी इमर्सिव कॉन्सर्ट मालिके तर्फे दिली जाईल. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी जगप्रसिद्ध बीटल्स वाद्यवृंदची गाणी सादर केली जातील. आणि यातील प्रत्येक कार्यक्रम प्रेक्षकांना नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव देईल.

 

लिव्ह युवर सिटी, फीव्हर लॅब्स इंकच्या एका विभागाद्वारे निर्मित, कँडललाइट कॉन्सर्ट्स प्रतिभावान स्थानिक कलाकारांच्या सहकार्याने उत्कृष्ट शास्त्रीय कलाकृतींपासून समकालीन हिट्सपर्यंत विविध प्रकारच्या संगीताचा अनुभव रसिकांना देत भारतात त्यांचा विस्तार वाढवत आहे. पुण्यात झालेल्या यशस्वी लाँचनंतर कँडललाइट कॉन्सर्ट संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यापलीकडेही या अनोख्या कार्यक्रमाची रासिकांवर छाप पाडण्यासाठी तयार आहेत, ज्यामुळे या संपूर्ण भागातील संगीत प्रेमींसाठी लाईव्ह संगीत अधिक आकर्षक आणि आनंददायक ठरेल.

 

 

पुण्यातील आगामी कार्यक्रम :

 

कँडललाइट : कोल्डप्लेला आदरांजली

स्थळ: रॅडिसन ब्लू हॉटेल, पुणे खराडी

तारीख आणि वेळ: 27 आणि 28 सप्टेंबर (वेळ- 17:00, 19:00 आणि 21:00)

कालावधी : 60 मिनिटे

संगीतकार: पियानोवादक – सोनम लोधी

मूल्य: 1 तिकीट – 1,499 पासून

 

कँडललाइट: बीटल्सला आदरांजली

स्थळ: रॅडिसन ब्लू हॉटेल, पुणे खराडी

तारखा आणि वेळा: 18 सप्टेंबर (वेळ- 17:00, 19:00 आणि 21:00)

कालावधी : 60 मिनिटे

संगीतकार: पियानोवादक – सोनम लोधी

मूल्य

: 1 तिकीट – 1,399 पासून

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments